वादळग्रस्त आसूद गावानं दाखवली प्रकाशाची वाट

रत्नागिरी: (सचिन-बाक्कर) – रत्नागिरी: निसर्ग चक्रीवादळामुळं प्रचंड नुकसान झालेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील मु पोस्ट. आसूद तालुका.दापोली जिल्हा. रत्नागिरी गावानं सहकारातून उद्धाराचा नवा आदर्श घालून दिला आहे. अनेक दिवसांपासून अंधारात असलेल्या मु पोस्ट. आसूद तालुका.दापोली ग्रामस्थांनी सरकारच्या मदतीची वाट न पाहता प्रकाशानं गाव उजळून टाकलं आहे.
जून महिन्याच्या सुरुवातील आलेल्या निसर्ग वादळाने रत्नागिरी जिल्ह्यात घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. घरांची छपरे उडाली. विजेचे खांब कोसळून पडले. त्यामुळं अनेक गावे अंधारात गेली. गर्द झाडीत वसलेले दापोली तालुक्यातील आसूद गावही काळोखात बुडून गेले. एरवी छोट्याशा पावसात आणि वाऱ्यातही वरचेवर वीज पुरवठा खंडित होण्याचा अनुभव असलेल्या आसूद गावकऱ्यांनी चक्रीवादळानंतर वीज लवकर येईल याची आशाच सोडली होती. मात्र, गावातील तरुण मंडळींनी आशा सोडली नव्हती. त्यांनी या समस्येवर उपाय करण्याचे ठरवून कामाला सुरुवात केली.
सचिन बाक्कर (मु पोस्ट. आसूद तालुका.दापोली जिल्हा. रत्नागिरी) ह्यांच राहत घर वादळाने पडले गेलं त्यात इजा कोणाला झाली नसून खूप काही प्रकारे नुकसान त्यात आंबा फणस नारळ सुपारी असे काही झाडे सुद्धा पडले गेले एक नारळाचं झाडं घरावर पडले गेले म्हणजे असे काही नुकसान झाले. त्यात पोलीस पाटील,तलाठी,ग्रामपचायत शहानिशा करून गेले आहेत तरी ही अद्याप काही नुकसान भरपाई मिळाली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here