औरंगपूर येथील शेतकऱ्याने पाच एकर पपईवर फिरवला रोटाव्हेटर

नंदुरबार (जिल्हा प्रतिनिधी विजय पाटील) – शहादा तालुक्यातील औरंगपूर येथील हताश झालेल्या शेतकऱ्याने 5 एकर पपई पिकावर ट्रॅक्टर रोटाव्हेटर फिरवला.लाखो रुपये खर्च करून पपई पिकाची लागवड केल्यानंतर त्यावर अज्ञात विषाणूच्या आक्रमणामुळे पिक पूर्णत: खराब झाले असून परिसरातील विविध अनुभवी शेतकऱ्यांचा सल्ला घेतल्यानंतर कीटकनाशकांची फवारणी करण्यात आली परंतु त्याचाही काही उपयोग झाला नाही. पपई पिकाची वाढ खुंटते मुळे त्याला लागलेल्या फळांनी पाहिजे तसा आकार घेतला नाही म्हणून अखेर हतबल झालेल्या शेतकर्‍याने आपल्या शेतातील पाच एकर पपई वर रोटावेटर फिरवला.
याविषयी अधिक माहिती घेतली असता औरंगपूर येथील शेतकरी श्री राकेश पाटील या शेतकऱ्याने जवळपास चार लाख रुपये खर्च पपई पिकाच्या वाढीसाठी केला होता.पपई पिकाच्या लागवडी पासून म्हणजेच पपई चे रोप अन्या पासून ते फवारणी ,खते, मजुरी इत्यादींसाठी लाखो रुपये खर्च खर्च झाला आहे परंतु सध्या स्थितीत असलेल्या पपईच्या वाढीचा अंदाज घेता शेतकऱ्याच्या एकच गोष्ट लक्षात आली की यातून लावलेला खर्चही निघणार नाही म्हणून शेवटी शेतकऱ्यांनी हा निर्णय घेतला.शिवारातील एका प्रगतिशील शेतकऱ्यांने हताश होऊन शेवटी असा निर्णय घेणे हा सर्वच शेतकऱ्यांच्या जिव्हारी लागला आहे.तरी अशा अडचणीच्या प्रसंगी शेतकऱ्यांना प्रशासनाकडून आवश्यक ती माहिती व मार्गदर्शन मिळणे आवश्यक आहे असे मत परिसरातील नागरिक व्यक्त करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here