जळगाव जिल्ह्यात आज आढळले ६६७ कोरोनाबाधित

११ कोरोनाबाधितांचा मृत्यू; आज जळगाव आणि
जामनेर तालुक्यामध्ये रुग्णांची संख्या सर्वाधिक

जळगाव (प्रतिनिधी) – कोरोना संशयित व्यक्तींच्या स्वॅब तपासणीचा अहवाल आज (दि.१३) प्राप्त झाल्यानंतर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत आज ६६७ कोरोनाबाधितांची वाढ झाली आहे. ५३८ कोरोनाबाधितांनी कोरोनावर मात केली असली, आज सर्वाधिक १५० कोरोनाबाधित जळगाव शहरात तर ११२ कोरोनाबाधित जामनेर तालुक्यात आढळून आले आहे.
आज आढळलेल्या ६६७ कोरोनाबाधितांमध्ये जळगाव शहर- १५०, जळगाव ग्रामीण-१६, भुसावळ-४०, अमळनेर-३२, चोपडा-६१, पाचोरा-२८, भडगाव-५, धरणगाव-४७, यावल-१८, एरंडोल-२९, जामनेर-११२, रावेर-१६, पारोळा-५४, चाळीसगाव-१९, मुक्ताईनगर-२९, बोदवड-६ आणि इतर जिल्ह्यातील ५ असा समावेश आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाबाधितांची एकूण संख्या ३८ हजार ८३६ झाली असून त्यापैकी २७ हजार ७४९ रूग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. दरम्यान आज ११ रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून जिल्ह्यात कोरोनामुळे मृत झालेल्या कोरोनाबाधितांचा एकूण आकडा ९७१ वर पोहचला आहे. सद्यस्थितीत १० हजार ११६ रूग्ण कोवीड रूग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती शासकीय महाविद्यालय तथा जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ नागोराव चव्हाण यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here