वाहनांच्या बॅटरी चोरणाऱे चोरटे शहादा पोलिसांच्या जाळ्यात

नंदुरबार (जिल्हा प्रतिनिधी विजय पाटील) – जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील शिवशक्ती नगरातील खडी क्रेशरच्या मोकळ्या जागेत उभ्या असलेल्या वाहनांच्या बॅटऱ्या चोरणारे चोरटे शहादा पोलिसांच्या जाळ्यात सापडले आहेत, याप्रकरणी शहादा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
प्रकाशा गावालगत मोकळ्या जागेत शिवशक्ती स्टोन क्रेशर मेटल आहे. त्यांच्या मोकळ्या परिसरात उभ्या असलेल्या ५ ट्रक ट्रॅक्टर यांच्या एकूण ११ बॅटऱ्या चोरट्यांनी चोरुन नेल्या होत्या. शहादा पोलिस ठाण्यात पवन दत्तू चौधरी यांनी फिर्याद दाखल केल्यावरून शहादा पोलिसांनी चौकशी केली असता, वाड्या मोग्या वसावे (वय २६), किसन आरसी वसावे (वय ३४, दोघे रा.कार्थदे दिगर पुनर्वसन) यांना ताब्यात घेतले. त्यांना न्यायालयात उभे केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली. या दोघा आरोपींकडून ३५ हजार रुपयांच्या सात एक्साइड एक्सप्रेस कंपनीच्या बॅटऱ्या, १० हजार रुपये किंमतीच्या दोन गिगावॅट कंपनीच्या बॅटऱ्या, १० हजार रुपये किंमतीच्या दोन ॲटोबॅट ड्राइव्ह कंपनीच्या बॅटऱ्या, २० हजार रुपयांच्या चार एक्साईड कंपनीच्या बॅटऱ्या असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here