सांगली (विशेष प्रतिनिधी स्वप्निल कारेकर) – सांगली महानगरपालिकेच्या नगरसेविका ॲडवोकेट स्वाती शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त छोटेखानी अभीष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी सांगली शहरातील मान्यवरांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी एसव्ही सांगली जिल्हा ड्रायव्हर असोशियनचे अध्यक्ष श्रीकांत लोखंडे व जिल्हा सचिव रोहित घुबडे -पाटील, प्रवीण सूर्यवंशी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर सचिव विजय मौऱ्या, महिला सेनेच्या प्राची कुदळे आदी उपस्थित होते.







