सांगलीत आटपाडी येथील जबरी चोरीचा गुन्हा उघड; एलसीबीकडून तीन आरोपी जेरबंद

आटपाडी

सांगली (जिल्हा संपादक संजय तोडकर) | घरगुती वादाची किंवा दरोड्याची भीती दाखवून वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने हिसकावून घेणे आणि विरोध करणाऱ्या मुलावर चाकूने वार करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) धडक कारवाई केली आहे. या गुन्हesh सहभाग असलेल्या तिन्ही संशयित आरोपींना पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत बेड्या ठोकल्या असून, त्यांच्याकडून ६० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

 

काय आहे नेमकी घटना?

आटपाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पळसखेल (कुचकरवस्ती) येथील फिर्यादी द्वारकाबाई साहेबराव कुचेकर या दि. १८ सप्टेंबर २०२६ रोजी रात्रीच्या सुमारास आपल्या घरासमोर असताना, कानटोपी आणि जॅकेट घातलेले तीन अनोळखी तरुण तिथे आले. त्यांनी फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याची माळ जबरदस्तीने ओढून हिसकावून घेतली. यावेळी झालेल्या हल्ल्याला फिर्यादीचा मुलगा भारत साहेबराव कुचेकर याने विरोध केला असता, आरोपींनी त्याच्यावर चाकूने वार करून त्यास गंभीर जखमी केले आणि मोटारसायकलवरून पळ काढला. या प्रकरणी आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला सखोल तपासाचे आदेश दिले होते. त्यानुसार पोनि संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि प्रशांत निशाणदार व पथकाने घटनास्थळाची पाहणी केली. घटनास्थळी सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध नसतानाही पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदारांच्या मार्ফত आरोपींचा माग काढला.

दिनांक २१ सप्टेंबर २०२६ रोजी पोलिसांना मिळालेल्या खबरीत नमूद तीन व्यक्ती आटपाडी ते दिघंची जाणाऱ्या रोडवरील कारखानापाटी येथील ‘ए. जे.’ हॉटेलसमोर थांबल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी तिघांनाही शिताफीने ताब्यात घेतले.

पोलिसांनी या प्रकरणी १) सोमनाथ मल्हारी चव्हाण (वय २३) २) राजू प्रल्हाद काळेल (वय ३१) 3) महादेव ऊर्फ प्रसाद श्रीकांत बुधावले (वय १९, सर्व रा. वरकुटे, मलवडी, ता. माण, जि. सातारा)  यांना जेरबंद केले असून, अंगझडतीदरम्यान आरोपी सोमनाथ मल्हारी याच्याकडे एक प्लास्टिकची पिशवी मिळून आली, ज्यामध्ये ४९ सोन्याचे लहानमणी (वजन ४ ग्रॅम ४०० मिली, किंमत ६०,००० रुपये) सापडले. कसून चौकशी केली असता त्यांनी कुचकरेवाडी येथे वृद्ध महिलेच्या अंगावरील दागिने खोबवून नेल्याची आणि मुलावर चाकूने वार केल्याची कबुली दिली.

सदर आरोपी आणि जप्त करण्यात आलेला मुद्देमाल पुढील कायदेशीर कारवाईसाठी आटपाडी पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून, पुढील तपास आटपाडी पोलीस करत आहेत. ही यशस्वी कारवाई सांगली LCB च्या अधिकारी व अंमलदारांच्या पथकाने पार पाडली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here