साईबाबा संस्थान व्यायामशाळेतील सभासदांच्या उपस्थितीत पत्रकार तुषार महाजन यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार

पत्रकार तुषार महाजन

अहिल्यानगर (प्रतिनिधी) | युवा पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते तुषार संजय महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त श्री साईबाबा संस्थान व्यायामशाळेत त्यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. साईबाबा संस्थान व्यायामशाळेचे प्रशिक्षक तथा आंतरराष्ट्रीय खेळाडू महेश गोसावी यांनी व्यायामशाळेतील सर्व सभासदांच्या उपस्थितीत तुषार दादा महाजन यांचा सत्कार करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांच्या पुढील सामाजिक व पत्रकारितेच्या वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या.

 

पत्रकारिता, समाजसेवा, विद्यार्थीहित आणि पर्यावरण संवर्धन अशा विविध क्षेत्रांत तुषार महाजन सक्रिय आहेत. सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना पत्रकारितेच्या माध्यमातून वाचा फोडण्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी पाठपुरावा, रक्तदानाबाबत जनजागृती तसेच विविध सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग राहिला आहे.

विशेष म्हणजे, महाजन यांनी आपल्या वाढदिवसाला सामाजिक उपक्रमांची जोड देण्याची परंपरा जपली आहे. वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण, विद्यार्थ्यांना शालेय गणवेश व खाऊवाटप, फलवृक्षांचे वाटप यांसह विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येत आहेत. ‘वाढदिवस केवळ वैयक्तिक आनंदाचा दिवस न राहता समाजासाठी काहीतरी करण्याची संधी ठरावी’, या भावनेतून हे उपक्रम राबविले जात आहेत.

तुषार महाजन हे सध्या ग्रीन फाउंडेशन महाराष्ट्र राज्यचे उपाध्यक्ष, राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष, सोशल तरुणाई फाऊंडेशनचे प्रसिद्धी प्रमुख, जीवन आधार फाऊंडेशन (रेस्क्यू फोर्स)चे जिल्हाध्यक्ष तसेच हिंदी-मराठी पत्रकार संघाचे सदस्य म्हणून विविध सामाजिक व संघटनात्मक जबाबदाऱ्या सांभाळत आहेत.

वाढदिवसानिमित्त झालेल्या सत्कारावेळी व्यायामशाळेतील सभासदांनी तुषार दादा यांना शुभेच्छा देत त्यांच्या पुढील वाटचालीस यश लाभावे आणि त्यांच्या हातून समाजहिताचे कार्य सातत्याने घडत राहावे, अशा सदिच्छा व्यक्त केल्या. यावेळी तुषार महाजन यांनी आंतरराष्ट्रीय खेळाडू तथा प्रशिक्षक महेश गोसावी आणि साईबाबा संस्थान व्यायामशाळेतील सर्व सभासदांनी केलेल्या सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here