ॲड. कुणाल पवार यांची फवारणी करण्याची मागणी

जळगाव (संपादक सुनिल पाटील) – शहरात मोठ्या प्रमाणात कोविडचे पेशंट आढळून येत आहे. त्याचप्रमाणे शहरातील चुकीच्या नियोजनमुळे मोठ्या प्रमाणात खड्डे झाले आहेत. पाणी योजनेच्या कामांमुळे रस्त्यात विष कालवले आहे. शहरातील वाहनचालकांना मणक्यांचे विकास जडत आहेत. बऱ्याच प्रभागात पायी चालता येत नाहीत, अशी रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. अशातच पाऊस पडल्याने, ठिकठिकाणी असलेल्या खड्ड्यात पाणी साठून तळे साचले आहे. त्यात डासांची पैदास मोठ्या प्रमाणात होत असून, डेंग्यू आणि मलेरियाची फवारणीदेखील महानगरपालिकेकडून करण्यात न आल्याने, मोठ्या प्रमाणात रोगराई पसरत आहे. परिणामी कोरोना रुग्णांमध्येदेखील वाढ होत आहे.
त्यामुळे महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरातील प्रभागांमध्ये फवारणी लवकरात लवकर करावी व नागरिकांचे फ्ल्यू, मलेरिया, डेंग्यूपासून संरक्षण करावे. फवारणी त्वरित न केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरून नागरिकांसाठी आंदोलन करेल व होणाऱ्या परिणामास मनपा प्रशासन व मनपा आयुक्त जबाबदार असतील, असे राष्ट्रवादी काँग्रेस जळगावचे सचिव ॲड. कुणाल पवार यांनी महानगरपालिकेचे आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here