नंदुरबार (जिल्हा प्रतिनिधी विजय पाटील) – नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव येथील पंचायत समितीच्या दरबारमध्ये प्रधानमंत्री घरकुल चे अंतिम हप्ते न मिळाल्याने चुलवड मार्फत उपोषण घेण्यात आले मागील काही महिन्यापूर्वीच लाभार्थ्यांनी घरे बांधून पूर्ण केली व अंतिम हप्त्यासाठी त्यांनी पाच ते सहा महिन्यांपूर्वी फाईल्या जमा केल्या असून सुद्धा त्यांचे हप्ते पडत नसल्याने त्यांनी थेट गटविकास अधिकारी व कर्मचाऱ्यांना विचारपूस केली असताना त्यांना वाऱ्यावरची उत्तरे दिली जात असल्याचे समोर आले आहे.
अनेक वेळा तोंडी व लेखी स्वरूपात अर्ज करून सुद्धा त्यांच्या हप्ता न मिळाल्याने संतप्त लाभार्थ्यांनी उपोषणाचा मार्ग काढला तसेच त्यांनी अनेक तक्रारी व अर्ज केले असून सुद्धा त्या अर्जांना त्यांचा तक्रार्यांना फारसे लक्ष न देता त्यांना कलमडत ठेवण्यात आले व लाभार्थ्यांकडून काही कर्मचाऱ्यांनी पैशाची मांग केली असून लाभार्थ्यांनी ती रक्कम त्या अधिकाऱ्यांना दिल्याची बाब समोर आली असून या कर्मचार्यांवरही कारवाईची मागणी लाभार्थी व संघटने कडून करण्यात आली आहे तसेच योग्य तो तपास करून दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी असे चुलवड ग्राम पंचायतचे सदस्य विजय पावरा यांनी केली .
तसेच उमराणी गावातील घरकुल लाभार्थ्यांचे रक्कम अपहार केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे सन 2020 2021 या आर्थिक वर्षात प्रधानमंत्री आवास घरकुल योजना मार्फत रोहिदास पावरा यांना घरकुल मंजूर झालेला आहे सदरील घरकुल योजनेचा लाभ घरकुलचा पहिला हप्ता झाला असतानाच उमराणी बुद्रुक बीट इंजिनियर घरकुल योजनेचा लाभ बघणारा इंजिनियर यांच्या अनुपस्थितीत श्री राजेंद्र सरदार पावरा आपल्या पदाचा गैरवापर करून बुरकीबाई रोहिदास पावरा यांच्या नावाने घरकुलच्या पहिला हप्ता वितरित असताना परस्पर रक्कम काढून घेतली व त्यांच्या घरातील मंगलाबाई राजेंद्र पावरा व त्यांची साली सेजल गुलाबसिंग पावरा यांच्या नावाने उर्वरित पहिल्या हप्त्याची रक्कम काढून घेतली असल्याने ए एन एस ग्रुप उमराणी बृ व ग्रामस्थ याकडून बि.डि.ओ. साहेबांना निवेदन देण्यात आले व निवेदनात म्हटले आहे की दोषींवर कडक कारवाई करण्यात यावे व फौजदारी गुन्हा दाखल करावा असे म्हटले आहे आहेत एकीकडे अंतिम हक्कासाठी वारंवार फिरवाफिरव करणारे लाभार्थी तर दुसरीकडे पहिल्या हप्त्यासाठी लाचार असलेली लाभार्थी अशी अवस्था आज धडगाव तालुक्यात दिसत आहे या प्रसंगी A.N.S. ग्रुप उमराळे बुद्रुक बिरसा क्रांतीदल आदिवासी जनजागृती आदिवासी युवा एकता परिषद रुद्रा अपंग संघटना महाराष्ट्र राज्य आधी संघटनांनी दोषींवर कडक कारवाई करण्याची व फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे
याप्रसंगी धडगाव चे गट विकास अधिकारी व सभापती रविंद्र पराडके यांनी उपोषणाला उपस्थित राहून उपोषणदारांना विनंती करून आम्ही तुमच्या मागण्या पूर्ण करू अंतिम हप्ते तुम्हाला मिळतील त्यासाठी आम्ही प्रयत्न करू पुढच्या 15 तारखेनंतर तुमच्या खात्यावर तुमचे हप्ते पडतील व ज्यांनी या कामात गोड केला आहे अशा कर्मचाऱ्यांना आम्ही त्यांना नोटीस बजावू व त्यांच्यावर कडक कारवाई करू व अशा कर्मचार्यांना बडतर्फ करू असा विश्वास देऊन उपोषण मागे घेण्यास पूर्ण प्रतिसाद देऊन उपोषणाला पुढच्या पंधरा तारखे पर्यंत अर्धविराम देण्यात आले व संध्याकाळी साडेतीन वाजेच्या दरम्यान उपोषण मागे घेण्यात आले याप्रसंगी सुलवड ग्रामपंचायतचे सदस्य विजय पावरा धडगाव चे सभापती गट विकास अधिकारी लाभार्थी व आदिवासी जनजागृती टीम ,आदिवासी युवा एकता परिषद, बिरसा क्रांतीदल , अपंग संघटना महाराष्ट्र राज्य ANS ग्रुप उमराणे बुद्रुक इत्यादी संघटना उपस्थित होत्या.







