सारी सर्व्हेक्षणातील शिक्षक – शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करणार

वर्धा उपविभागीय दंडाधिकारी सुरेश बगळे यांचा निर्णय

वर्धा (प्रतिनिधी मनोज बाचले) – सोमवारी (दि.१४) उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी सुरेश बगळे यांची वर्धा जिल्हा शिक्षण समन्वय समितीच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. त्यावेळी मांडलेल्या विषयानुसार श्री.बगळे यांनी शिष्टमंडळाच्या म्हणण्याला दुजोरा देत काही महत्त्वाचे निर्णय घेतले.
चर्चेअंती माहे जुलैपासून सारी सर्व्हेक्षणात कार्यरत असलेल्या सर्व शिक्षक/ शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना आज किंवा उद्या कार्यमुक्त करणे, रविवारी व शासकीय सुट्टीच्या दिवशी सर्व्हेक्षणाच्या कामाला सुटी राहील असे परिपत्रक काढणे, मागील तीन महिन्यांपासून जे शिक्षक नोडल अधिकारी म्हणून काम करीत आहे, त्यांना तात्काळ कार्यमुक्त करण्याचे आदेश जिल्ह्यातील सर्व बीडीओ व तहसीलदार यांना देणार असल्याचे श्री.बगळे यांनी शिष्टमंडळाला सांगितले.
राज्य शासनाद्वोरे सुरु झालेल्या माझे कुटुंब माझी जवाबदारी या शासनाच्या मोहिमेअंतर्गत वर्धा शहरात आरोग्य तपासणीचे काम सुरू झाल्यास, सारी सर्व्हेक्षणाचे काम बंद करण्यात यावे अशी मागणी यावेळी समन्वय समितीने केली, त्यावर त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून याबाबत निर्णय घेण्यात येईल असे शिष्टमंडळाला सांगितले.
यावेळी मुख्याध्यापक संघटनेचे सतीश जगताप, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे जयप्रकाश थोटे, महेंद्र सालंकार, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे अजय वानखेडे, प्रवीण भोयर, चंद्रकांत ठाकरे, मनीषा साळवे, सुरेश रोठे, खाजगी प्राथमिक शिक्षक संघाचे सुरेशकुमार बरे, जूनी पेन्शन हक्क संघटनेचे प्रमोद खोडे, सागर मसराम, प्रजासत्ताक शिक्षक कर्मचारी संघटनेचे अरुणकुमार हर्षबोधी, महाराष्ट्र माध्यमिक डी. एड. शिक्षक महासंघाच्या पद्मा तायडे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here