शहादा तालुका भारतीय जनता पक्षातर्फे सेवा सप्ताह

नंदुरबार (जिल्हा प्रतिनिधी विजय पाटील) – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक 14 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर दरम्यान सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून याबाबत शहादा तालुका भारतीय जनता पक्षातर्फे तालुक्यातील प्रकाशा येथील केदारेश्वर मंदिर ट्रस्ट परिसरातील ज्येष्ठ नागरिक भाविक भक्त व प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णांना फळ वाटण्याचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला.
यावेळी भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष ईश्वरभाई पाटील,तालुका उपाध्यक्ष संजय पाटील,अशोक पाटील, प्रकाशा ग्रा.प.सरपंच सुदाम ठाकरे,उपसरपंच भरत पाटील,पं.स.सदस्य वीरसिंग ठाकरे,वाघोदा सरपंच वासुदेव पाटील,भाजपा मच्छीमार सेल जिल्हाध्यक्ष पंडित भोई, मनोज सोनार,सहकार आघाडी तालुकाध्यक्ष दिलीप ज्ञानदेव पाटील,अंबालाल कोळी,पावबा गुरव माजी सरपंच भावडू ठाकरे,प्रवीण वाडीले, करण्खेडा सरपंच चुनीलाल पाटील,प्रकाश ठाकरे,भाजपा ट्रान्सपोर्ट आघाडी तालुकाध्यक्ष दिलीप पाटील,अनिल ठाकरे व कार्यकर्ते पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रास्ताविक व सूत्रसंचालन भाजपाचे तालुका उपाध्यक्ष संजय पाटील यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here