कोरोना योद्धा म्हणून सेवा दिलेल्या मृत शिक्षकांच्या कुटुंबियांना 50 लाख रू मदत देण्याची मागणी

तात्काळ प्रस्ताव पाठविण्याचे जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी यांचे आश्वासन

वर्धा (प्रतिनिधी मनोज बाचले) – स्थानिक रत्नीबाई विद्यालय येथील कलाशिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या तसेच कोरोना योध्दा म्हणून सेवा देणाऱ्या 48 वर्षीय शिक्षकाचा कोरोनाा मुळे 11 सप्टेंबर रोजी मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबियांना पन्नास लाख रुपयांची मदत देण्याची मागणी आज महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, तक्रार निवारण समिती, वर्धा जिल्ह्या च्या वतीने आज अजुभाऊ भोयर यांचे नेतृत्वात जिल्हाधिकारी, वर्धा व उपविभागीय अधिकारी , वर्धा यांना आज करण्यात आली व तातडीने त्यांचा प्रस्ताव पाठविण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
सदर कला शिक्षकाची दिनांक 2 जुलै ते 12 जुलै 2020 ह्या कालावधीत नालवाडी कंटेनमेंट झोनमध्ये तर दिनांक 16 जुलै ते दिनांक 28 जुलै 2020 या कालावधीत सिंदी ( मेघे ),वर्धा येथे कंटेनमेंट झोन मध्ये कोरोना च्या ह्या संसर्गाच्या काळात त्यांची सेवा अधिग्रहीत करण्यात आली होती.
त्यानंतर त्यांना श्वास घेण्यास त्रास व्हायला लागल्याने कस्तुरबा रुग्णालय सेवाग्राम येथे नेण्यात आले. परंतु I C U मध्ये खाटा शिल्लक नसल्याचे कारण पुढे करीत त्यांना उपचार नाकारण्यात आल्याने पर्यायाने तातडीने त्यांना सावंगी मेघे येथे दाखल करण्यात आले व त्यांची कोवीड चाचणी करण्यात आली असता, अहवाल पॉझिटिव्ह आला.दिनांक 11 सप्टेंबर 2020 रोजी उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
कोविडच्या संसर्गाच्या काळात कोरोना योद्धा म्हणून सेवा देणाऱ्या शिक्षकाला उपचार नाकारणे ही गंभीर बाब असून यामुळे शिक्षकांमध्ये संतापाची लाट पसरली असल्याची बाब त्यांनी जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आणुन दिली. कोरोना योद्धा म्हणून काम केलेल्या शिक्षकाच्या कुटुंबाला 50 लाख रूपयाची तातडीने मदत देण्यात यावी व तात्काळ कोविड संसर्गात सेवा दिलेल्या व सेवा देत असलेल्या सर्व शिक्षकांचा तात्काळ विमा संरक्षण द्यावे .तसेच उपचारापासून कोणताही कोरोना च्या संसर्गात सेवा देत असलेला शिक्षकांच्या उपचारात हयगय होणार नाही याची दक्षता घ्यावी असेही निवेदनात नमूद करण्यात आले.
ह्या सर्व मागणीची तातडीने दखल घेत पुर्तता करण्यात येईल असे आश्वासन निवासी जिल्ह्याधिकारी श्री कोरडे तथा उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांनी यावेळी दिले.
यावेळी म रा शिक्षक परिषद तक्रार निवारण समितीचे पुंडलिक नागतोडे, कुंडलिक राठोड, मुकेश इंगोले, सुनिल गायकवाड, राजेंद्र वसु, राजेंद्र बडगुजर, निलेश भालकर, संजय बारी आदि उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here