कंगना राणौतने मुख्यामंत्र्यांची माफी मागावी – समदभाऊ शेख

मुंबई (प्रतिनिधी प्राजक्ता अरूण चव्हाण) – बॉलिवूडमधील नेपोटिझमचा वाद तसेच सुशांतसिंह आत्महत्याप्रकरणी कंगणा राणौत व महाराष्ट्र असा वाद चांगलाच पेटला आहे. या वादादरम्यान कंगनाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केल्याने, संतप्त होत शिवसेना युवासेना पिंपळनेर सर्कल समदभाऊ शेख यांनी कंगना राणौतने मुख्यमंत्र्यांची माफी मागवी, अशी मागणी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे केली आहे.
या प्रसिध्दीपत्रकात त्यांनी म्हटले आहे की, मुख्यमंत्री हे संविधानिक पद असून राज्याचे प्रथम नागरीक म्हणुन मुख्यमंत्र्याना संबोधले जाते. एवढे मोठे पद असताना अभिनेत्री कंगना रनौत हिने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावांचा एकेरी उल्लेख करणे हे अत्यंत खेदजनक आहे. शिवसेना, युवासेना पिंपळनेर सर्कलच्या वतीने तिचा आम्ही जाहिर निषेध करत आहोत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here