भुसावळ (प्रतिनिधी गिरिश पाटील) – शहरातील सुरळीत व सुरक्षित वाहतुकीची जबाबदारी असणाऱ्या वाहतुक पोलीस शाखेचा अवघ्या १७ पोलिस कर्मचाऱ्यांवर सुरु असल्याची माहिती समोर येत आहे.
याबाबत बुलंद पोलिस टाइम्स्ने अधिक माहिती जाणून घेतली असता, समजलेले वृत्त असे की, शहर शाखेचे पोलीस उपनिरीक्षक के. टी. सुरळकर तीन महिन्यापूर्वी निवृत्त झाले आहेत. त्यापाठोपाठ तीन सहाय्यक फौजदार देखील निवृत्त झाले आहेत. 26 कर्मचारी असलेल्या वाहतूक शाखेतून 4 कर्मचारी निवृत्त झाल्याने सध्या 22 कर्मचारी सेवा बजावत आहेत. त्यापैकी काहीजण रजेवर तर काही पोलीस कर्मचारी आजारी आहेत, तसेच 55 वर्षापेक्षा अधिक वयाचे पोलीस कर्मचारी कामावर नसल्याने वाहतूक शाखेत फक्त 17 कर्मचारी कार्यरत आहे.
दरम्यान, शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. वाहतूक शाखेचा पदभार शहर पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्याकडे दिला आहे. बस स्थानक चौक, पांडूरंग टाकीज,हंबर्डीकर चौक, नाहाटा कॉलेज चौफुली आदी ठिकाणी वाहतूक कोंडी वाढली आहे.







