आज आढळले ८७८ कोरोनाबाधित; १८ रुग्णांचा झाला कोरोनामुळे मृत्यू
जळगाव (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील कोरोना संशयित रुग्णांच्या स्वॅब तपासणीचा अहवाल मंगळवारी (दि.१५) प्राप्त झाल्यानंतर ८७८ कोरोनाबाधित आढळून आले. जळगाव शहरासह, चोपडा, अमळनेर तालुक्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढत आहे. आज ७०७ कोरोनाबाधितांनी कोरोनावर मात केली आहे.
मंगळवारी आढळलेल्या ८७८ कोरोनाबाधितांमध्ये जळगाव शहर-१५०, जळगाव ग्रामीण-४९, भुसावळ-५१, अमळनेर-१२६, चोपडा-१२४, पाचोरा-३७, भडगाव-३५, धरणगाव-४८, यावल-१९, एरंडोल-३४, जामनेर-५६, रावेर-२२, पारोळा-३४, चाळीसगाव-२५, मुक्ताईनगर-१९, बोदवड-४० व दुसर्या जिल्ह्यांमधील ९ असा समावेश असल्याची माहिती शासकीय महाविद्यालय तथा जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ नागोराव चव्हाण यांनी दिली आहे.







