चंफाई (वृत्तसंस्था) – मिझोरामला बुधवारी (दि.२४) सकाळी ८.०२ वाजण्याच्या सुमारास आणखी एक भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.१ एवढी होती. मिझोरामपासून ३१ किमी दक्षिणेकडे असणाऱ्या चंफाई जवळ भूकंपाचे केंद्र असल्याची माहिती भूकंप विज्ञान केंद्राने दिली आहे. यापूर्वी सोमवारी (दि.२२) आणि रविवारी (दि. २१) मिझोरामला भूकंपाचे धक्के बसले होते. या भूकंपामुळे अद्याप कोणतेही जीवीत अथवा मालमत्तेचे नुकसान झाले असल्याचे समोर आले नाही. मात्र, आज पुन्हा भूकंपाचा धक्का बसल्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातवरण आहे.







