- तहसिलदारांच्या आजच्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागून
- महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम 1966 मधील तरतूदींनुसार कारवाई होउन पाच पट दंड वसूल करण्यात यावा व तोच निधी बोदवड तालुक्यातील कोव्हिड १९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात यावा.
बोदवड रेल्वे स्टेशन परिसरातील अवैध वाळूसाठ्याचा तलाठ्यांकरवी पंचनामा
Buland Police Times ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಬುಧವಾರ, ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ 16, 2020
भुसावळ (प्रतिनिधी गिरीश पवार) – औरंगाबाद पहूर जामनेर मुक्ताईनगर रसत्यावरील सुरु असलेल्या रेल्वे क्रॉसिंग ऊड्डाणपूलाच्या बांधकामासाठी मातीमिश्रित निकृष्ठ वाळू वापरल्या गेल्याचा प्रकार ऊघडकीस आला आहे. दिनांक १५ रोजी युवासेना तालूका समन्वयक तथा राष्ट्रीय छावा संघटनेचे विधानसभा संपर्कप्रमूख अमोल व्यवहारे यांनी बोदवडचे तहसिलदार हेमंत पाटिल यांना रेल्वे स्टेशन परिसरात अवैध वाळूसाठा साठवणूक झाल्याबाबत निवेदन दिले होते.
त्यानंतर तहसिलदार यांच्या आदेशानुसार नाडगांव तलाठी यांनी याप्रसंगी पंचनामा केला. तलाठी नाडगांव यांना कुठल्याही प्रकारचे रॉयल्टी परवान्याचे कागदपत्रे संबंधित बांधकाम कंपनीच्या व्यवस्थापकाकडून देण्यात आले नसल्याने वाळू साठा अवैध असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे सुमारे ४५ ते ५० ब्रास वाळूचा पंचनामा तलाठ्यांनी केला असून आज सार्वजनिक बांधकाम विभागाकडून वाळू साठवल्याचा अधिकृत आकडा येथील सा.बां. विभागाच्या प्रकल्प व्यवस्थापक असलेले श्री.भंडारी यांच्याकडून घेतला जाणार असून त्यानंतर कारवाई करण्यात येणार असल्याचे तहसिलदार हेमंत पाटिल साहेब यांनी दिनांक १५ रोजी कळविले.
गत दोन महिन्यांअगोदर येथे विनारॉयल्टी अवैधरित्या मुरुम वाहतूक होत असल्याचा प्रकार तहसिलदार यांच्या लक्षात आणून दिला होता. त्यानंतर ऊड्डाणपूल बांधकाम कामासाठी वापरण्यात येणाऱ्या मुरुम वाहतूक रॉयल्टीतून तहसिल कार्यालयास १ लाख २० हजार रुपयांचा महसूल शिवसेना नाडगाव शाखेच्या सतर्कतेने जमा झाला होता. या पार्श्वभूमिवर ; हिच सतर्कता बाळगत परत अवैध वाळूसाठा आढळल्याने संबंधिताकडून महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम 1966 मधील तरतूदींनुसार कारवाई होउन पाच पट दंड वसूल करण्यात यावा व तोच निधी बोदवड कोव्हिड १९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात यावा. 
निवेदनात नमूद होते कि, संपूर्ण जिल्हाभरात गतवर्षापासून वाळूचा लिलाव बंद असून बोदवड तालूक्यात अवैध वाळू वाहतूकीचा गोरखधंदा तेजीत सुरु आहे. त्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बूडत आहे. बोदवड तालुक्यातील रेल्वे स्टेशन परिसरात ऊड्डाणपूलाचे बांधकाम करणाऱ्या कंपनीच्या कामगारांचे विश्रांती गृह तसेच कार्यालय असून याच स्थळावरुन बांधकाम संदर्भातील कामकाज केल्या जाते. याच परिसरात संबंधित कंत्राटदाराकडून गेल्या पाच ते सहा दिवसांपासून अवैध वाळूची साठेबाजी करण्याचा प्रकार सुरु होता. गौणखनिज सर्रास लूटण्याचा प्रयत्न सुरु आहे. कोव्हिड १९ च्या पार्श्वभूमिवर शासनाच्या तिजोरीत खळखळाट निर्माण झाला आहे. त्यामुळे विनारॉयल्टी वाळू वाहतूकीमूळे शासनाचा महसूल बुडविण्याचा प्रकार होत असल्याने आपण तात्काळ प्रत्यक्ष स्थळी पाहणी करुन साठवणूक केलेल्या अवैध वाळूच्या साठ्याचा पंचनामा करुन सदरील वाळूसाठा जप्त करावा तसेच दोषींवर तातडीने दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रीय छावा संघटना विधानसभा संपर्क प्रमूख तथा युवासेना तालूका समन्वयक बोदवड अमोल व्यवहारे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनाच्या प्रती त्यांनी आमदार चंद्रकांतभाऊ पाटिल ( मुक्ताईनगर ), जिल्हाधिकारी जळगाव, उपविभागीय अधिकारी भुसावळ यांनाही पाठविल्या आहेत.







