धुळे (संतोष कोळी) – शिंदखेडा येथे संदिपदादा बेडसे युवा मंच व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने बेरोजगार तरूणांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे़ तरूणांनी संधीला लाभ घ्यावा असे आवाहन राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष संदिप बेडसे यांनी केले आहे़
प्रतिभावन कंजूमर प्रॉडक्ट अॅड सर्हिेसेस प्रायव्हेट लिमिटेड पुणे या कंपनीसाठी टार्गेट बेसवर मार्केटिंग फिल्ड आॅफिसर या पदासाठी ३० मुले व ३० मुली अशा ६० जाणा भरण्यात येणार आहे़ यासाठी १८ ते ५० वयोगटातील दहावी ते पदवीधर बेरोजगार तरूण अर्ज करू शकतात़ निवड झालेल्या उमेदवारास १२ हजार रुपए व ३००० रुपए प्रवास भत्ता दिला जाणार आहे़
इच्छूकांनी १८ सप्टेंबर रोजी ११ ते १ या वेळेत मुलाखतीसाठी श्री स्वामी समर्थ माध्यमिक विद्यालय, जाधव नगर, भगवा चौक, शिंदखेडा येथे बायोडाटा, आधार कार्ड, बँक पासबुक, २ पासपोर्ट फोटो घेऊन हजर राहावे़अधिक माहितीसाठी प्रांजल सोनार, प्रवीण पाटील, गोलू देसले, चेतन देसले, दर्पण पवार, दुर्गेश पाटील, चिराग माळी यांच्याशी संपर्क साधावा़







