महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघ संलग्न भारतीय मजदूर संघ वेतनवाढसंदर्भात निवेदन

जळगाव (संपादक सुनिल पाटील) – आज महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघ संलग्न भारतीय मजदूर संघ च्या वतीने धुळे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ जळगाव, धुळे, व नंदुरबार जिल्हा नोंदणीकृत सुरक्षा रक्षक यांचा वेतनात जास्तीत जास्त वाढ करण्यात यावी. या संदर्भात निवेदन देण्यात आले.
आजच्या घडीला कोवीड 19 ह्या आजाराने थैमान घातले आहे. अशा परिस्थितीत सुरक्षा रक्षक आपले कर्तव्य ठोस पद्धतीने बजावत आहेत. अशा संकट समयी सध्या सुरक्षा रक्षक यांना तुंटपुजे वेतन मिळत आहे. अशा कमी वेतनात जगायचे कसे दिवसेंदिवस महागाई वाढत असल्याने कमी वेतनात उपासमारीला सामोरे जावे लागत असल्याने आज संघटनेचे वतीने निवेदन देण्यात आले.
सल्लागार समिती महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक मंडळ सदस्य (महाराष्ट्र शासन) ॲड. विशाल मोहिते यांनी मंडळातील वरीष्ठ क्लर्क ए.टी. चव्हान यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला आणि वेतनवाढ व निवेदनामध्ये दिलेले मुद्दे संदर्भात मार्गदर्शन केले.
पहिल्यांदा शैक्षणिक व प्रवास भत्ता लागू प्रस्ताव 3,500/- चा पण पगारवाढ 2,500/- हजार च्या खाली पगारवाढ घेणार नाही. विशेष प्रयत्न नंदुरबार हा आदिवासी जिल्हा आहे त्या ठिकाणी विशेष आदिवासी भत्ता लागू करण्यात यावा. अशा मागण्या मान्य करण्यात आल्या.
मिलिंद वाणी अध्यक्ष आणि पंकज कोळी सचिव यांचे निवेदन यशस्वी ठरले.योगाचे मार्गदर्शक ॲड. विशाल मोहिते सल्लागार महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक समिती, अनिल पाळदी, संदीप पाटील, अविनाश मुंडे, कृष्णा साठे, नितीन शेडगे, किरण पवार प्रभारी सुरक्षा रक्षक महासंघ महाराष्ट्र यांचे सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here