शाळांच्या मुजोरीविरोधात वाशी मनसेची कारवाई करण्याची मागणी

वाशी (प्रतिनिधी) – कोरोना महामारीच्या काळात आरोग्य तर धोक्यात आले पण सतत ६ ते ७ महिन्याच्या लॉक डाउन मुळे अनेकांचे उद्योग धंदा, नोकरी आणि व्यापार ठप्प पडला आहे अश्या स्थितीत घर खर्च चालवणे मोठया जिकरीचे झाले आहे त्यात शाळांनी फी चा तगादा लावल्याने पालकांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. मुलांच्या भवितव्यासाठी त्यांचे शिक्षण थांबू नये म्हणून पालकांना तारेवरची कसरत करावी लागते.
मनसेकडे आलेल्या तक्रारीनुसार ॲड.अक्षय काशिद यांनी फेसबुक live केलं त्यात महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या निर्णय याचे पालन शाळांनी करावे आणि तोपर्यंत सर्व पालकांनी फी भरू नये असे आवाहन केले त्याला मोठा प्रतिसाद मिळाला, त्यात काही शाळांनी मुलांचे शिक्षण फी न भरल्याने बंद केले.
ऑनलाइन शिक्षण हे ID आणि पासवर्ड वर चालतं तेच ब्लॉक केलं गेलं, त्यानंतर ॲड. अक्षय काशिद यांच्या नेतृत्वाखाली मनसेचे शिष्टमंडळाने पनवेल मधील शाळांच्या मुजोरी विरोधात गट शिक्षण अधिकारी नवनाथ साबळे यांची पनवेल मनसेच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन संबंधित शाळांवर कारवाई करण्याची मागणी केली.
त्यावर त्वरित दखल घेत संबंधित शाळांना कार्यवाहीसाठी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यातूनही शाळा अश्याच बेकायदेशीर गोष्टी करीत राहील्यास पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील शाळांसाठी शिक्षणमंत्री यांना भेटून घेराव घालण्यात येईल असे मत व्यक्त केले त्यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष अतुल भगत, विदयार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष ऍड अक्षय काशिद, वाहतूक सेनेचे प्रवीण दळवी, खारघर शहराध्यक्ष प्रसाद परब, कामोठे चे शहराध्यक्ष रोहित दुधवडकर, संतोष पंडित, सत्यजित मयेकर,मनोज कोठारी, विशाल चौधरी, घनश्याम वंजारी, भगवान कदम, श्रीनाथ परब, आदर्श कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here