मुंबई (विशेष प्रतिनिधी) – माजी मंत्री एकनाथराव खडसे (नाथा भाऊ) यांना यांच्या राजकीय संघर्षात माळी समाजाचा जाहीर पाठींबा महाराष्ट्र माळी समाज महासंघ नाथा भाऊ यांच्या पाठीशी.
माळी समाजाचे अधिकृत व्यासपीठ महाराष्ट्र माळी समाज महासंघ या राज्यस्तरीय महासंघाची ऑनलाईन मिटींग संपन्न झाली मार्गदर्शक म्हणून राज्याचे माजी महसुल मंत्री भाजपाचे जेष्ठ नेते आदरणीय एकनाथराव खडसे (नाथा भाऊ) यांचे मार्गदर्शन लाभले माळी समाज महासंघाचे प्रदेश अध्यक्ष श्री.अनिलजी महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील प्रमुख प्रतिनिधी उपस्थित होते यांच्या सह महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे प्रदेश पातळीवरील,जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीच्या सुरुवातीला महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे प्रदेश अध्यक्ष श्री.अनिलजी महाजन यांनी सुरुवातीला सर्वं समाज बांधवांना आपले विचार मांडण्यासाठी वेळ दिला.काही समाज बांधवानी आपले विचार मांडले.
नंतर आदरणीय एकनाथराव खडसे (नाथाभाऊ) यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली.अतिशय सूंदर आणि मोजक्या शब्दांत सुरुवात केली. ते म्हणाले, आपल्या राज्यामध्ये माळी समाज सर्वात जास्त संख्येने असून विखुरला गेला आहे. राज्याच्या जडणघडणीत माळी समाजाचे योगदान खूप मोठे आहे.माळी समाजाने महाराष्ट्रालाच नव्हे आपल्या देशाला रत्न दिले. आहेत.क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले व माता सावित्रीबाई फुले आहेत.
तसेच माळी समाजाने अनेक नेते महाराष्ट्राला दिले छगन भुजबळ यांनी माळी समाजासह ओबीसी समाजाची मोट बांधली आहे त्या बद्दल त्यांचे अभिनंदन पण त्यांच्या नंतर कोण ? असे प्रश्न समाजापुढे आहेत आहेत.राजकारणात जर आपल्या समाजाचा दबदबा किंवा आपल्या समाजाची ओळख निर्माण करायची असेल तर ;आधी सर्व माळी समाजाने गट- तट न करता सर्वांनी एकाच छताखाली एकत्र येणे गरजेचे आहे.महाराष्ट्र मध्ये माळी समाजाच्या अनेक छोट्या मोट्या शाखा व संघटना आहेत. परंतु राजकीय पक्षांनी स्वार्थासाठी माळी समाजाचा फक्त उपयोग करून घेतला. असून माळी समाजाला याची जाणीव होणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन राज्यव्यापी मोर्चा,सभा,आंदोलन केल्याशिवाय सरकारला व महाराष्ट्राला माळी समाजाची खरी ओळख होणार नाही. क्रांती करण्याचे सामर्थ्य माळी समाजामध्ये असून जनजागृतीची आज खऱ्या अर्थाने गरज आहे. त्यासाठी अनिलजी महाजन यांच्या मध्ये माळी समाजाचे नेतृत्व करण्याची क्षमता आहे असे. नाथाभाऊ बोलताना म्हणाले . नाथा भाऊनी प्रदेश अध्यक्ष अनिल जी महाजन यांचे झूम ऑनलाईन मिटिंग आयोजन करून मला सर्व समाज बांधव पर्यंत बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांनी आयोजकांचे अभिनंदन केले.
होय आम्ही तुमच्या सोबतच …..! माळी समाज महासंघाच्या वतीने एकनाथराव खडसे (नाथा भाऊ)यांना त्यांच्या राजकीय संघर्षात माळी समाजाचा जाहीर पाठींबा देत असल्याबाबत प्रदेश अध्यक्ष अनिल महाजन यांनी आज ऑनलाईन मिटींग मध्ये जाहीर केले.








