धुळे (विशेष प्रतिनिधी) – महाराष्ट्र शासन छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय वनश्री पुरस्कार प्राप्त निसर्गमित्र समिती तर्फे धुळे येथील वलवाडी स्थित कार्यालयात जागतिक ओझन दिन साजरा करण्यात आला.
याप्रसंगी निसर्ग-मित्र समितीचे प्रदेश सचिव संतोषराव आबा पाटील- कार्यक्रमाचे अध्यक्ष- होते, तर निसर्ग-मित्र समिती चे संस्थापक प्रेमकुमार अहिरे , प्रा डॉ प्रविण नेरपगार सर,जेष्ट विधीतज्ञ अँड धृवकुमार जाधव -प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते वृक्ष पुजन करण्यात आले,तर सोनगीर येथील डॉ,अजय सोनवणे यांनी कोरोना या महामारीत गरीबांना विशेष सहकार्य व योगदानाबद्दल *कोरोना योद्धां म्हणून सन्मान पत्र,शॉल,वृक्ष,छत्रपती शिवाजी महाराजांचे आज्ञापत्र व फेटा बांधून सत्कार करण्यात आला,तसेच जि,प,चे.शिक्षक विशाल परदेशी यांना -जिल्हा परिषद चा -आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्या बद्दल मान्यवराच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला,कार्यक्रमास धुळे शहराध्यक्ष प्रा एच ए पाटील,
धुळे शहर संपर्क-प्रमुख वैभव पाटील,धुळे तालुका संपर्क-प्रमुख कांतिलाल देवरे सर, शिंदखेडा तालुका संपर्क -प्रमुख सुधीर सनेर,जि,सं राजेंद्र ढोडरे सर,धुळे तालुका संघटक आदर्श शिक्षक सुनिल पाटील-सर,धुळे शहर संघटक शिवाजी बैसाणे सर कार्यालयीन -प्रमुख निसर्ग अहिरे आदी पदाधिकारी उपस्थित होते,कार्यक्रमाचे प्रास्ताविक,सुत्रसंचालन संघटक आदर्श शिक्षक सुकलाल बोरसे यांनी केले तर आभार प्रदर्शन धुळे तालुका संपर्क-प्रमुख कांतिलाल देवरे सर यांनी केले,अशी माहीती जिल्हाध्यक्ष डी बी पाटील व -जिल्हा प्रसिद्धी -प्रमुख प्रा डॉ प्रविणसिह गिरासेे यांनी पत्रकन्वये दिली आहे.








