अमोदा येथे वेडाच्या झटक्यात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

शहादा (विजय निकम) – तालुक्यातील अमोदा(फत्तेपुर) येथे जांबळाच्या झाड़ाच्या फांदी ला दोर बांधून एका विवाहित तरुणाने गळफास लाऊन आत्महत्या केल्याची घटना दि.15 सप्टेंबर रोजी घडली याबाबत म्हसावद पोलिसात अकस्मात मृत्यूची नोद करण्यात आली आहे.
याबाबत पोलिस सूत्रा कडून माहिती अशी की,शहादा तालुक्यातील फत्तेपुर येथील शांतीलाल उखा जयस्वाल यांच्या शेताच्या बांध्यावर असलेले जांबळाच्या झाड़ाच्या फांदीला दोर बांधून एका 30 वर्षीय विवाहित तरुण रविंद्र होमा पवार रा.फत्तेपुर ता.शहादा याने वेडाच्या भरात दि.15 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजे च्या सूमारास त्याने आत्महत्या केली. त्याने आत्महत्या वेडाच्या भरात केली अशी माहिती मयताचे वडील होमा गुला पवार यांनी दिल्या वरुन म्हसावद पोलीसात अकस्मात मृत्यु ची नोद करण्यात आली आहे. मयताचे प्रेत म्हसावद ग्रामीण रुग्णालयात शव विच्छेदन करुन प्रेत नाते वाईकांच्या ताब्यात देण्यात आले..याबाबत पुढील तपास सपोनि किरण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार गुलाबसिंग पावरा हे करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here