जळगाव जिल्ह्यात गुरुवारी ८११ कोरोनाबाधितांनी केली कोरोनावर यशस्वी मात

आज ९४८ कोरोनाबाधित आढळले; कोरोनामुळे १६ रुग्णांचा मृत्यू

जळगाव (प्रतिनिधी) – कोरोना संशयित व्यक्तींच्या स्वॅब तपासणीचा अहवाल आज (दि.१७) प्राप्त झाल्यानंतर जिल्ह्यात ९४८ कोरोनाबाधित आढळून आले. सातत्याने कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून, आज जळगाव शहरासह चाळीसगाव, भुसावळ आणि जामनेर तालुक्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे.
आज आढळलेल्या ९४८ कोरोनाबाधितांमध्ये जळगाव शहर-२५२, जळगाव ग्रामीण – ५५, भुसावळ-८८, अमळनेर-८८, चोपडा-४७, पाचोरा-४३, भडगाव-११, धरणगाव-४६, यावल-५८, एरंडोल-३३, जामनेर-७३, रावेर-१५, पारोळा-१२, चाळीसगाव-९२, मुक्ताईनगर-१६, बोदवड-१३ व दुसर्‍या जिल्ह्यांमधील १५ असा समावेश आहे.
आज प्राप्त झालेल्या अहवालानंतर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ४१ हजार ८५६ झाली असून, त्यातील ३० हजार ७०२ कोरोनाबाधितांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. दरम्यान आज १६ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून, एकूण मृतांचा आकडा १०४३ झाला असून, सद्यस्थितीत १० हजार १११ कोरोनाबाधितांवर उपचार सुरु असल्याची माहिती शासकीय महाविद्यालय तथा जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ नागोराव चव्हाण यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here