नंदुरबार (जिल्हा प्रतिनिधी विजय पाटील) – आज मौजे कन्साई येथील सामाजिक सभागृह येथे ऊस शेतीशाळेचा ८ वा वर्ग घेण्यांत आला प्रथमतः मागील शेतीशाळेचा मागोवा श्री हरिभाऊ खोमणे यांनी घेतला त्यानंतर ऊस प्रक्षेत्रांवर जाऊन ऊस पिक परिसंस्था निरीक्षणे घेण्यात आली त्यानंतर सामाजीक सभागृह येथे श्री हरिभाऊ खोमणे कृषि सहाय्यक यांनी शेतकरी प्रतिज्ञा घेतली त्यानंतर हरिभाऊ खोमणे यांनी आय. सी . एम .टाळी बाबत मार्गदर्शन केले लघूअभ्यास म्हणून कृषि सहाय्यक यांनी दशपर्णी अर्क बाबत मार्गदर्शन केले तसेच कन्साई येथील दिलवर ठाकरे यांनी ऊस पिक परिसंस्था पृथ्य करण चित्रीकरण व सादरीकरण केले तसेच किशोर देवचंद पाटील यांनी देखील चित्रीकरण व सादरीकरण केले सदर वर्गास सरपंच श्री प्रभाकर ठाकरे, श्री सुकलाल बोराणे, श्री सिताराम ईशी, श्री लोहार, श्री संदिप पाटील, श्री हिरालाल सोजळ, धनराज मराठे इतर सर्व शेतीशाळा लाभार्थी उपस्थित होते त्यानंतर चहा, नाश्ता घेण्यांत आला व आभार प्रदर्शन मानून कार्यक्रमाचा समारोप झाला.








