चोपड्यात पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताहात विविध कार्यक्रम

चोपडा (प्रतिनिधी संदीप ओली) – सेवा सप्ताह निमित्त व देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या ७०व्या वाढदिवसानिमित्त चोपडा तालुका भारतीय जनता पार्टीमार्फत सेवा सप्ताहाअंतर्गत आज पक्ष कार्यालयात पदाधिकार्‍यांनी मोदीजींच्या कार्याचा गौरव केला तसेच विविध कार्यक्रम पार पाडण्यात आले.
त्यामध्ये कोरोनामुळे मृत्यु पावलेल्या व्यक्तींचे अंतिमसंस्कार करणार्‍या योद्ध्यांचा सत्कार भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकार्‍यांच्या हस्ते करण्यात आला.चोपडा उपजिल्हा रुग्णालय येथील रुग्णांना पदाधिकांर्‍याच्या हस्ते फळवाटप करण्यात आले.कोविड केयर सेंटरमधील रुग्णांना मास्क, फळ ,बिस्कीट पाकीट वाटप करण्यात आले.वृक्षारोपणाचा कार्यक्रम पदाधिकार्‍यांच्या हस्ते करण्यात आला.याप्रसंगी उत्तर महाराष्ट्र ओबीसी सेल अध्यक्ष प्रदिप पाटील, तालुकाध्यक्ष पंकज पाटील,जि.प.सदस्य गजेंद्र सोनवणे,पं.स.उपसभापती भुषण भिल,जिल्हा चिटणीस राकेश पाटील,शहराध्यक्ष गजेंद्र जैसवाल,माजी शहराध्यक्ष राजू शर्मा,मनिष गुजराथी,बाजार समिती संचालक धनंजय पाटील,तापी सुतगिरणी संचालिका सौ.रंजनाताई नेवे,डाॅ.भारतीताई क्षिरसागर,युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष नरेंद्र पाटील,जिल्हा संवाद संयोजक भरत सोनगिरे,युवा मोर्चा तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील,पंकज पाटील,सरचिटणिस सुनिल सोनगिरे,परेश धनगर,पिंटू पावरा,विवेक गुर्जर,विकास पाटील,बारकू पाटील,योगराज पाटील,भरत पाटील,लक्ष्मण पाटील,विजय बाविस्कर,सोशल मिडीया संयोजक मिलिंद वाणी,कार्यालय मंत्री मोहित भावे,आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here