अलिबाग (राजेश बाष्टे) – आपणांस कळकळीची विनंती करतो की, अजून वेळ गेलेली नाही….खरच…. जर आपल्याला 2021 पाहायचा असेल तर आपल्या मध्ये खूप बदल करावा लागेल….आताची परिस्थिती पाहता जर आपण आपल्या वागण्यामध्ये बदल नाही केला तर आपण नक्कीच 2021 नाही पाहू शकत…. कम्युनिटी स्प्रेड ला सुरुवात झालेली आहे… ऑगस्ट पर्यंत आपल्या कुठल्या मित्राला नातलग ला कोरोना झाल्याची बातमी कानावर येत नव्हती….
पण आता वेळ बदलली आहे ..आपले जवळचे नातलग मित्रमंडळी ही सुद्धा कोरोना पॉझिटिव सापडत आहेत…. आता भीती कोरोना ची नाही…. भीती आहे आपल्याला वेळेवर उपचार न मिळण्याची… आपल्या जिल्ह्यातील परिस्थिती खूप बिकट आहे ऑक्सीजन व व्हेंटिलेटर बेड कुठेही अवेलेबल नाही… होम आयसोलेशन हाच एकमेव पर्याय आता सर्वांच्या जवळ आहे…. कोरोना झाल्यावर होम आयसोलेशन करण्यापेक्षा आत्ता सर्वांनी स्वतःला होम आयसोलेशन करून घेणे हाच एकमेव पर्याय आहे… शासनाने दिलेल्या सर्व नियमांचे पालन करणे हाच एकमेव मार्ग आहे… कोणीही आपल्या किती जवळचा जरी असला तरी त्यांच्या शुभ कार्याला न जाणे हेच शहाण्या माणसांची लक्षण आता दिसत आहेत…
गरज असेल तरच बाहेर पडा…. तुमच्यावरती तुमचं पूर्ण कुटुंब अवलंबून आहे. तुम्हाला काही कमी जास्त झालं तर तुम्ही विचार करा तुमच्या कुटुंबाचे काय होईल…तुमच्या कुटुंबाला व तुमच्या आयुष्याला प्रथम महत्त्व द्या … पैसे ही माणसाची शेवटची गरज आहे…. आज लोकांच्याकडे खूप पैसे असून सुद्धा लोक उपचाराविना स्वतःला व स्वतःच्या कुटुंबाला वाचवू शकत नाही….माझी सर्वांना नम्रतेची विनंती आहे की तुम्ही स्वतः व तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या व गरज असेल तरच तरच बाहेर पडा…… भविष्य खुप अवघड आहे हे वर्षे फक्त जगण्यासाठी जगा आपली काळजी घ्या …







