अलिबाग (राजेश बाष्टे) – पेण नगरपालिकेच्या समोर एक आदिवासी महिला रस्त्यामध्ये चक्कर येऊन पडली होती येणारे-जाणारे तिच्याकडे पाहून दुर्लक्ष करून निघून जात होते तिच्यामुळे रस्त्यावरील वाहनांना अडचण होत असल्याचे रायगड
भूषण जेष्ठपत्रकार जयपाल पाटील यांनी पाहिले आणि ते घटनास्थळी पोहोचले मावशी मावशी असं तिला म्हणाले पण ती बेशुद्ध अवस्थेत असल्यामुळे त्यांनी ताबडतोब समोरच्या दुकानातून पाणी घेऊन तिच्या चेहर्यावर टाकले ती तावातावाने उठली आणि त्यांच्याच वर फुले वाहू लागली ,आणि पुन्हा रस्त्यातच आडवी पडली होती पत्रकार जयपाल पाटील पहात होते कोणी मदत करेल का ?एवढ्यात पेण पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस श्रीमती चव्हाण व श्रीमती मोकल तेथे आल्या आणि तिघांनी तिला उचलून रस्त्याच्या शेजारी दुकानाजवळ ठेवली
त्यामुळे रस्त्याची वाहतूक सुरळीत सुरू झाली हा प्रसंग पेणचे पत्रकार सुनील पाटील यांना दिसला असता त्यांनी लगेच छायाचित्रे घेतली त्यांचे आणि पोलिस कर्मचाऱ्यांचे आभार ज्येष्ठ पत्रकार जयपाल पाटील आपत्ती व सुरक्षा तज्ञ यांनी मानले.







