आंबिवली शहरात व्यसनाच्या जाळ्यात तरूणाई

  • कोरोना महामारी मध्येही पोलीस यंत्रणा आरोग्य विभाग पालिका प्रशासन सुस्त
  • ठाणे जिल्हा संघटिका सौ सुवर्णा ताई कानवडे यांची तहसीलदार याच्याकडे तक्रार

कल्याण (विशेष प्रतिनिधी) – लॉकडाऊन मध्ये हळूहळू शिथिलता येते असली तरी अद्याप हॉटेल व्यवसाय सुरू करण्यास परवानगी नाही. मात्र, टिटवाळा पोलीस स्टेशन हद्दीतील अंबिवली गाव येते श्रद्धा प्रसाद हॉटेल बंदी असताना चक्क हॉटेलमध्ये हुक्का पार्लर अवैध दारू विक्री सुरू असल्याचा प्रकार समोर येत आहे
2019 मध्ये अनेक नागरिकांच्या व पत्रकार यांच्या पाठपुराव्याने टिटवाळा पोलिसांनी श्रध्दा प्रसाद हॉटेल वर छापा मारून हुक्का पार्लर वर गुन्हा दाखल करून बँड केले होते. पण आर्थिक मोहाला बळी पडणारे जागा मालक याने पुन्हा श्रद्धा प्रसाद हॉटेल ची सुरुवात केली आहे पार्सल च्या नावाखाली हॉटेल मालक अवैध रित्या छुपा हुक्का पार्लर व अवैध दारू विक्री चालवत आहे सदर जागा CRZ मध्ये अनधिकृत बांधकाम करून हॉटेल तयार केले आहे अनेक वेळा प्रभाग क्षेत्र अधिकारी यांना कल्पना देऊन सुद्धा प्रभाग क्षेत्र अधिकारी सुधीर मोकळं हॉटेल वर कारवाई करत नाही.
अनधिकृत बांधकाम मध्ये प्रभाग क्षेत्र अधिकारी भूमाफिया यांच्या सोबत साठे लोटे करून आर्थिक व्यवहार तर करत नाही ना अनेक वेळा तक्रार करून सुद्धा प्रभाग क्षेत्र अधिकारी अनधिकृत हॉटेल वर कारवाई का करत नाही असा आरोप केला जात आहे.
हुक्का पार्लर व अवैध रित्या दारू विकणाऱ्या वर कारवाई व्हावी यासाठी श्रमिक मुक्त पत्रकार संघाच्या ठाणे जिल्हा संघटिका सौ सुवर्णा ताई कानवडे यांनी मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री ,जिल्हाधिकारी उपविभागीय अधिकारी कल्याण पालिका आयुक्त , मुख्य वैदयकीय अधिकारी, तहसीलदार यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे
कोरोना महामारी मध्ये नशा माफिया हॉटेल च्या नावाखाली अवैध धंदे करून तरुण तरुणी यांना व्यसनाची सवय लावून पैसे कमवित आहे तर प्रशासन कोरोना महामारी वर अश्या धंद्यावर मूग गिळून गप्प राहून कल्याण तालुक्यातील नागरिकांच्या जीवाशी खेळत आहेत असे स्थानिक नागरिकांचा आरोप आहे
एका जागी राज्य सरकार कोरोना रोगावर नियंत्रण आणण्यासाठी उपयोजना करत आहे तर स्थानिक पातळीवर पालिका प्रशासन व पोलीस प्रशासन धूम्रपान सारख्या धंद्या करणाऱ्या माफिया सोबत हात मिळवणी करताना दिसत आहे. तरुणांमध्ये व्यसनाचे वाढते प्रमाण हे फॅशन बनत आहे. दारू सिगारेट तंबाखू गुटखा यांचे प्रमाण चिंताजनक आहे.टिटवाळा तालुका पोलीस स्टेशन हद्दीत याचे प्रमाण वाढत आहे
टिटवाळा तालुका हद्दीत श्रद्धा हॉटेल येथे चुपा अवैद्य दारू हुक्का पार्लर सुरू
तरुणीचे आकर्षण असलेल्या हुक्का पार्लर डिस्को यांना पोलिसांनी कोणत्याही प्रकारची परवानगी किंवा ना हरकत प्रमाणपत्र दिलेले नाही तसेच त्यांची कोणतीही माहिती पोलिसाकडे नसल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे माहिती अधिकार कायद्यान्वये पोलिसांनी दिलेल्या उत्तरात नाईट क्लब डिस्को कोणतीच माहिती पोलिसांकडे नाही तसेच नाईट क्लब पब डिस्को यांनी कोणत्याही प्रकारची परवानगी घेतली नाही असे सतत वरिष्ठ पोलीस निरीक्षक ही माहिती देत असतात श्रद्धा प्रसाद हॉटेल येथे मोठ्या प्रमाणात अवैध धंदे चालतात मात्र याबाबत पोलिसांना माहिती नसणे म्हणजे विकृतीला खतपाणी मिळत असल्याचे नागरिक म्हणतात
टिटवाला हद्दीत मानवी आणि मन संघटनेच्या माहितीनुसार हुक्का पार्लर अमली पदार्थाच्या सेवनाचे प्रमाण वाढत असून अनेक अल्पवयीन मुलेही हो का मी जात आहे शहरातील एका महाविद्यालयातील वस्तीगृहात बारावीनंतरच्या 60 ते 70 टक्के मुलांना विविध व्यसने असल्याचे समोर आले आहे मात्र सध्या 12 ते 13 वर्षानंतरच्या अनेक महाविद्यालयीन व शाळकरी मुलांमध्ये विविध व्यसनाचे प्रमाण वाढत आहे असे मानवी आणि मन संघटनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष सुवर्णाताई कानडे यांनी सांगितले
तंबाखूजन्य कायदा काय म्हणतो
सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने अधिनियम 2003
वेडी सिगारेट सिगार चिरूट मुक्ता गुटका तपकीर खेड्यांना लावण्याची मिस्त्री तसेच तंबाखूच्या सर्व प्रकारच्या पदार्थाचे सेवन ज्या ठिकाणी तेच लोकांना एकदा बसण्याची सुविधा किंवा ती तुमची सुविधा असेल अशा हॉटेल मध्ये उपलब्ध करून देण्याची मुभा मात्र या कायद्यातील नियमानुसार स्वतंत्र असणे बंधनकारक आहे शैक्षणिक संस्था पासून शंभर मीटरच्या आत अशा पदार्थांची विक्री करता येत नाही 18 वर्षाखालील मुलांना विक्री करण्यास बंदी आहे परंतु या ते कुठल्या त्याचे पालन होत नाही एका बाजूला राज्य सरकारने तंबाखूजन्य पदार्थ विक्रीस बंदी घातली आहे
कायदा कुचकामी
मोठ्या प्रमाणात तरुण-तरुणी व्यसनाला बळी पडत असताना देखील आणि नागरिकांचे अनेक तक्रारी असून सुद्धा वैद्यकीय अधिकारी प्रभाग क्षेत्र अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोणत्याही प्रकाराने तंबाखूचे पदार्थ विकणाऱ्या वर कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहे काही स्थानिक नागरिकांचा असं मत आहे की अवैद्य धंदे हुक्का पार्लर करणारे संबंधित अधिकारी यांना ल महिन्याला रु 200000 ठराविक रक्कम देऊन साटेलोटे करून धंदे चालवत असतात त्यामुळे आर्थिक बळाला बळी पडलेल्या अधिकारी अशा अवैध धंदे चालवणाऱ्याला लोकांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करतात
सिगारेट हुक्का पिण्यामुळे मुलीचे प्रमाण वाढत आहे दारू सोशल ड्रिंक्स सिगारेट गांजा प्रसाद म्हणून दिला जातो एखादा ग्रुप मध्ये कोणी व्यसन करत नसेल तर त्याला प्रवृत्त करतात आज तरुण-तरुणी व्यसनाला बळी पडल्यामुळे त्याचा गैरफायदा घेऊन अनेक अवैध धंदे करणारे माफिया मोठ्या प्रमाणात तरुणी तरुणीचा नशेचा गैरफायदा घेत धंदा करत आहे त्यामुळे येणारी नवीन पिढी तरुण-तरुणी मोठ्या प्रमाणात नशेमध्ये धुंद होत आहेत अनेक वेळा स्थानिक नागरिक व पालक यांनी अवैद्य धंदे चालवणाऱ्या वर कारवाई व्हावी यासाठी सतत तक्रार करत असताना देखील प्रशासन याच्यावर डोळे बंद ठेवून मुग गिळून गप्प बसतो असा काही स्थानिक नागरिकांचा आरोप आहे कोणतीही अवैध धंदे चालवताना प्रशासनाला सेटलमेंट केल्याशिवाय पैशाचा पॅकेट दिल्याशिवाय कोणालाही अवैध धंदे चालवता येत नाही असे स्थानिक नागरिकांचा आरोप आहे अवैध धंद्या मध्ये प्रशासन पाठबळ देत असेल तर मोठ्या प्रमाणात अवैध धंदे वाढत राहणारच कारवाई करणारे सदर आमिषाला बळी पडून मोहा पुढे आपले गुडघे टेकत असतील अवैध धंदे माफियांवर कारवाई तर कोण करणार असाही प्रश्न निर्माण होताना दिसत आहे अनेक वेळा अवैध धंदा विरुद्ध अनेक तक्रारी असून सुद्धा पोलीस प्रशासन अनेक कारणे दाखवून अवैध धंदे माफियांना पाठीशी घालत आहेत असाही आरोप स्थानिक नागरिकांचा आहे पोलिसांच्या आशीर्वादाशिवाय कोणतीही अवैध धंदे चालू शकत नाही त्यामुळे अवैद्य धंदे चालवणाऱ्या मोठा पाठबळ पोलिसांचा असतो असाही काही महिला संघटनेचा आरोप आहे
व्यसन मुक्ती साठी काम करणाऱ्या संस्था वाढविण्याची गरज आहे आज अल्पवयीन मुलांना मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढत असून त्याचे मुख्य कारण त्यांच्यातील व्यसन आहे अनेक गुन्हेगार कमी वयाच्या मुलांना बसण्यासाठी पैसे देऊन मोठे मोठे गुन्हे करून घेतात सध्या बाल न्याय मंडळ समोर 1900 प्रकरणे प्रलंबित आहेत
जर का पोलीस प्रशासन वैद्यकीय अधिकारी प्रभाग क्षेत्र अधिकारी आपल्या कर्तव्याचे पालन करून अवैधरित्या चालत असलेल्या धंद्यांवर तत्काळ कारवाई करतील तर अवैध धंदे करणाऱ्या माफियांवर आळा बसेल.
कमी वयात जास्त पैसे मिळत असल्यामुळे तसे धकाधकीच्या जीवनात आनंद फुलविण्यासाठी मजेसाठी तरुणही व्यसन करते त्यामुळे तरुणांची भविष्य धोक्यात आले आहे याचा गैरफायदा घेत मोठ्या प्रमाणात नशा व्यवसाय चालवणारे फायदा घेत आहे तरुण-तरुणी नशेला बळी पडल्या असल्याकारणाने अनेक अवैध धंदे करणारे माफिया तरुणी तरुण यांना नशेची लागत लावून कुबेर होत आहे.
टिटवाळा पोलीस स्टेशन हद्दीत अंबिबली येथे मोठ्या प्रमाणात चालणारे हुक्का पालर व अवैध दारू विक्री धंद्यावर नियंत्रण ठेवले नाही तर मोठ्या प्रमाणात कल्याण तालुक्यात तरुण-तरुणी आहारी जातील त्यासाठी संबंधित विभागाने योग्य दखल घेऊन अवैद्य हुक्का पार्लर अवैध दारू विक्री चालवणाऱ्या माफिया वर कठोर शासन करावे, अशी मागणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here