पनवेल (प्रतिनिधी गणेश पाटील) – तालुका पोलीस ठाणे, नवी मुंबई हद्दीत दिनाक 16/09/2020 रोजी सकाळी 08:30 वा.चे सुमारास मोरबेगावचे हद्दीत असलेले मोरबे धरणाचे जलाशयामध्ये रस्सीने व तारेने एका 48 किलो वजनाचे सिमेंटचे पोलभोवती समांतर गुंडाळुन बांधलेले स्थितीत एका अंदाजे 30 ते 35 वर्षे वयोगटातील महीलेचा मृतदेह तरंगत असताना मिळुन आलेला होता. मृतदेह पाण्यात जास्त काळ राहील्याने तो सडलेले व फुगलेले असस्थेत असल्याने मृतदेहाचे चेहरा विद्रुप झालेला असल्याने ओळखण्याचे स्थितीत नव्हता. यावरून पनवेल तालुका पोलीस ठाण्याकडे गुन्हा रजि. नं. 131/2020 भादवि कलम 302,201 दाखल करून मृतदेह पंचनामा करून ताब्यात घेवुन पुढील तपास चालु केला.
मृतदेह मिळुन आला त्यावेळी मयत महीलेचे एका हातामध्ये फक्त बांगडया व गोंदलेले चिन्ह होते, मयताचे अंगावर कोणत्याही प्रकारची कपडे नसल्याने व संपुर्ण प्रेत फुगल्याने चेह-यावरून मृतदेहाची ओळख पटवणे अवघड होते. गुन्हयाचे घटनेचे ठिकाणी वरीष्ठांनी भेट देवुन तपासाबाबत सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे श्री बिपीनकुमार सिंह साहेब, पोलीस आयुक्त, नवी मुंबई, डॉ.श्री, जय जाधव साहेब, पोलीस सह आयुक्त, नवी मुंबई, श्री अशोक दुधे साहेब, पोलीस उप आयुक्त, परि2, पनवेल, श्री प्रविण पाटील साहेब, पोलीस उप आयुक्त, गुन्हे शाखा, श्री रविंद्र गिड्डे साहेब, सहा.पो. आयुक्त पनवेल विभाग, श्री विनोद चव्हाण, सहा. पो. आयुक्त, गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे पनवेल तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपुत यांनी गुन्हयाचा तपास चालु करून, गुन्हयाचे तपासकामी पनवेल तालुका पोलीस ठाणेकडील पोलीस अधिकारी अंमलदार यांचे तपास पथक तयार केले. पनवेल तालुका पोलीस ठाणे व गुन्हे शाखेकडील तपास पथकाने गुन्हयाचा तपास चालु करून, मयताचे एका हातात असलेले बांगडया व गोंदलेले चिन्ह या छोटयाशा पुराव्यावरून साक्षीदारांचे मार्फतीने मृतदेहाची ओळख बारा तासाचे आत पटवण्यात यश प्राप्त झाले. त्यानुसार सदर मृतदेह हा आकुर्ली, पनवेल येथे राहणारे एका 27 वर्षे महीलेचा असल्याचे निष्पन्न झाले.
तपासादरम्यान माहीती मिळाली की, सदर महीलेचे कोप्रोलीगाव येथे राहणारे 32 वर्षीय युवकाशी अनैतिक संबध होते. तसेच सदर महीलेकडून त्याने काही रक्कमही घेतलेली होती. सदर पैशांवरून त्यांचेत नेहमी वाद होत होते. त्या वादातून त्यानेच साथीदारांचे मदतीने सदरचे कृत्य केल्याबाबत बातमीदाराकडून खात्रीशिर माहीती मिळाली होती. मिळाले माहीतीनुसार सदर युवकाचा शोध घेत असताना तो गुन्हा दाखल झाल्यापासुन गावातून पसार झाल्याची माहीती मिळुन आली होती. संशईत आरोपी हा त्याचे इतर साथीदार व मयताचे लहान मुलीसह सध्या सातारा जिल्हयातील कोरेगाव परिसरात फिरत असल्याची माहीती बातमीदाराकडून मिळाली होती. त्याप्रमाणे पनवेल तालुका पोलीस ठाणेकडील तपास पथकातील अधिकारी अंमलदार कोरेगाव, जि. सातारा येथे पाठवण्यात आले होते. तपास पथकातील अधिकारी अमलदारांनी कोरेगाव पोलीस स्टेशनचे पो.नि. सुनिल गोडसे व त्यांचे अधिकारी अंमलदार यांचे मदतीने संशईत आरोपींचा शोध घेवुन गुन्हयातील मयत महीलेशी अनैतिक संबध ठेवणारा 32 वर्षीय युवकासह त्याचे 23 ते 29 वर्षे वयाचे तीन साथीदार यांनाही दिनांक 18/09/2020 रोजी कोरगाव, जि. सातारा येथुन ताब्यात घेवुन, पनवेल तालुका पोलीस स्टेशन येथे आणुन त्यांचेकडे गुन्हयाबाबत चौकशी करता, त्यांचा गुन्हयातील सहभाग निष्पन्न झालेनुसार चारही आरोपींना अटक करून गुन्हा 48 तासाचे आत उघडकीस आणण्यात पनवेल तालुका पोलीस स्टेशनला यश आलेले आहे. अटक आरोपी यांचे ताब्यात मयत महीलेची 07 वर्षीय मुलगीही मिळुन आलेली आहे. तिचेबाबत बाल कल्याण अधिकारी, पनवेल-रायगड यांचेकडून आदेश प्राप्त करून घेवुन सुरक्षिततेसाठी सद्या बालगृहात ठेवण्यात आले आहे.
गुदर गुन्हा उघडकीस आणण्यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपुत, सपोनि विजय खेडकर, सपोनि नितीन पगार, सपोनि नितीन बडगुजर, मसपोनि योगिता कुदळे, पोउपनिरी सुनिल गुरव, पोहवा/142 मंगेश महाडीक, पोहवा/983 शंकर अवतार, पोहवा/1547 अजित म्हात्रे, पोहवा/30 अमोल कांबळे, पोहवा/2610 मंगेश भमकर पोना/1817 सागर रसाळ, पोना/2213 राकेश मोकल, पोकॉ/12119 संदिप चौधरी, पोकॉ/3182 तुषार पाटील पोकॉ/3171 संतोष पाटील, पोकॉ/12340 राजकुमार सोनकांबळे, पोकों/12556 सुनिल खैरनार, पोकॉ/3455 लिंबानी कायपलवाड यांनी महत्वपुर्ण कामगिरी केलेली आहे. गुन्हयाचा अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक करीत आहेत. आरोपी दिनांक 25/09/2020 रोजीपर्यंत पोलीस कोठडी रिमांडमध्ये आहेत.







