ठाणे (सहसंपादक एस.ए. बनसोडे) – पोलीस बॉईज असोसिएशन तथा गृहरक्षक दल होमगार्ड संघर्ष समिती मार्फत शनिवार (दि 19) अति महत्वाचा कोरोना योद्धा पुरस्कार ठाणे जिल्ह्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रकाश निलेवाड यांना जाहीर करण्यात आला आहे.
पोलीस आणि होमगार्ड यांच्या अडीअडचणीला नेहमी पुढाकार घेणारे तसेच सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांना अनेक पुरस्कारांनी सम्मानित केलेले आहे आज करोना महामारीमध्ये अनेक पोलिस अधिकारी कोरोना बाधित व अनेक शहीद झालेले आहे त्यांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी पोलीस बॉईज असोसिएशन तथा गृहरक्षक दल होमगार्ड संघर्ष समिती मार्फत सिद्धार्थ जाधव प्रदेश कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाश निलेवाड एसीपी ठाणे यांना कोरोना योद्धा पुरस्कार सतीश बनसोडे ठाणे शहर अध्यक्ष यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रविण लोटणकर ASI, नामदेव साळवे यांची प्रमुख उपस्थिती होती.







