भारतीय जनता पार्टी व युवा मोर्चा सिडको मंडल -2 येथे तन्मय गांगुर्डे यांच्यावतीने सेवा सप्ताह

नाशिक (विशेष प्रतिनिधी) – पंडित दिनदयाल उपाध्याय व महात्मा गांधी यांचे स्मरण करून जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेता व भारत भाग्य विधाता आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा सप्ताहात आज दि.१९ सप्टेंबर २०२० रोजी विविध कार्यक्रम व उपक्रम आयोजित केले गेले त्यात प्रामुख्याने ७० छत्री वाटप, मास्क वाटप, आर्सेनिक alb ३० चे देखील वाटप करण्यात आले.
प्रभाग क्र २८ मध्ये सॅनिटाईझशन पंपाचे उदघाटनदेखील करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा.आमदार. सीमाताई हिरे , नाशिक शहर सरचिटणीस जगन आण्णा साहेब पाटील, सिडको २ मंडल अध्यक्ष अविनाशजी पाटील, सरचिटणीस दिनेश जी मोडक, प्रभाग क्रं. 28 च्या नगरसेविका सौ.प्रतिभाताई पवार, योगेश मोरे भाजपा पदाधिकारी व परिसरातील नागरिक उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दीर्घायुष्याची कामना करत परिसरात सेवा सप्ताह राबविला नागरिकांना फळे वाटप करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here