शिरपुर (प्रतिनिधी प्रशांत वाकडे(वरुळ)) – टोकरे कोळी युवा मंच तर्फे व ग्राम रक्षक दल, वरुळ यांच्या सहकार्याने कोरोना सारख्या भयंकर महामारीच्या काळात रक्ताचा तुटवडा असल्याने रक्ताची अत्यावश्यकता भासत असल्यामुळे दि.19 सप्टेंबर, 2020 (शनिवार) रोजी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर, वरुळ, ता.शिरपूर, जि.धुळे येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले.
यावेळी डॉ.अरुणकुमार भानुदास कोळी (आधारस्तंभ टोकरे कोळी युवा मंच) व श्री.मनोहरदादा वाघ, सामाजिक कार्यकर्ते (मार्गदर्शक टोकरे कोळी युवा मंच) यांच्या मार्गदर्शनाने रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाला श्री.नितीन सुदाम कोळी (टोकरे कोळी युवा मंच संस्थापक अध्यक्ष), श्री.भैयासाहेब कोळी (टोकरे कोळी युवा मंच खान्देश विभाग प्रमुख), प्रतिभाताई मराठे (पोलीस पाटील वरूळ), प्रमोदभाई पटेल (चेअरमन -दिपकभाई पटेल इंग्लिश मेडीयम स्कुल), दिलीप निकुम (सामाजिक कार्यकर्ता), सुभाष सावळे (अध्यक्ष -शालेय व्यवस्थापन समिती), महेंद्र कोळी (टोकरे कोळी युवा मंच शिरपूर तालुकाध्यक्ष), प्रशांत वाकडे (आदिवासी कोळी समाज समन्वय समिती शिरपूर तालुका युवा अध्यक्ष), विकास कोळी (आदिवासी कोळी समाज समन्वय समिती कार्याध्यक्ष), नामदेव थोरात (सामाजिक कार्यकर्ते), ओंकार ईशी (अध्यक्ष -जिवा सेना धुळे जिल्हा), यशवंत मराठे (सामाजिक कार्यकर्ता), प्रतिभाताई मराठे (आशा कार्यकर्ता), मीनाक्षी सावळे (आशा कार्यकर्ता) यांनी उपस्थित राहून रक्तदात्यांचे मनोबल वाढवून रक्तदान करण्यास प्रोत्साहित केले. रक्तदान शिबिरात पंचक्रोशीतील 35 रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून कार्यक्रम यशस्वी केला. रक्तदात्यांना टोकरे कोळी युवा मंच तर्फे टी-शर्ट व प्रमाणपत्र देण्यात आले.
तसेच यावर्षी कोविड-19 या महामारीचा प्रादुर्भाव असल्याने गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सत्कार सोहळा आयोजित करणे शक्य नसल्याने इ.12 वीच्या परीक्षेत जयश्री एकनाथ सावळे- 84 टक्के, भाग्यश्री राकेश कोळी- 88 टक्के व इ.10 वीच्या परीक्षेत गिताजली लीलाचंद कोळी- 80 टक्के प्राप्त करणाऱ्या विद्यार्थिनींना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी टोकरे कोळी युवा मंचचे पदाधिकारी, सदस्य व स्वयंसेवक निलेश कोळी, मनोज कोळी,अमोल कोळी, संजय कोळी, योगेश कोळी प्रकाशाकर, योगेश सावळे, मुकेश कोळी, जितेंद्र कोळी, संतोष सावळे, महेंद्र निकुम, मनोज सावळे, मयुर कुंभार, रविन कोळी प्रकाशाकर, सचिन कोळी, मनीष कुवर, संदीप चव्हाण, गणेश आखडमल गोपाल आखडमल, योगेश आखडमल, मयूर कुंभार, मनोज सावळे, जितेंद्र कोळी, सतिष सावळे इत्यादी व वरुळ येथील ग्रामस्थ बांधव तसेच ज्ञात-अज्ञात व्यक्तींनी परिश्रम घेतले. तसेच स्व.श्री.मुकेशभाई पटेल ब्लड बँक, शिरपूर यांचे विशेष सहकार्य लाभले.







