नाशिक (जिल्हा प्रतिनिधी सतीष पाटील) – ओला , उबेर या प्रवासी वाहतूक सेवा कंपन्यांच्या धर्तीवर नाशिक मधील तरुणाने ‘ जनता टॅक्सी ‘ ही सेवा सुरू केली असल्याचे या सेवेचे समन्वयक संदीप जाधव यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत ‘ अभियानांतर्गत हे स्टार्टअप सुरू करण्यात आले असून , त्यात स्थानिक टॅक्सी , रिक्षाचालकांच्या माध्यमातून सेवा देण्यात येणार आहे . इतर विदेशी कंपन्यांच्या धर्तीवर ‘ जनता टॅक्सी ‘ ही संपूर्णपणे भारतीय आणि स्थानिक कंपनी आहे . रिक्षाचालक , कंपनीशी जोडून प्रवाशांना सेवा उपलब्ध टॅक्सीचालकांना अॅपच्या माध्यमातून होणार आहे .
आतापर्यंत ११०० कॅबची कंपनीकडे नोंदणी झाली असून , त्यातील सेवा सुरू करण्यात आली आहे . येत्या १५० कॅब आणि ३०० रिक्षांद्वारे शहरात काही दिवसांत तीन ते साडेतीन हजार वाहने या सेवेअंतर्गत उपलब्ध करून देण्याचा किमान शंभर वाहन चालकांना रोजगार देणार मानस आहे . कॅबद्वारे प्रत्येक तालुक्यातील असल्याचा दावा जाधव यांनी केला आहे . इतर कंपन्यांच्या तुलनेत दर १० ते १५ टक्यांपर्यंत कमी असल्याचा दावा जाधव यांनी केला आहे.कोविडच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक रिक्षा , टॅक्सीच्या सॅनिटायजेशनची काळजी घेण्यात येत आहे.







