रविवारी जळगाव जिल्ह्यात आढळले ५९६ कोरोनाबाधित

६०५ कोरोनाबाधितांनी केली कोरोनावर मात; आज १६ कोरोनाबाधितांचा मृत्यू

जळगाव (प्रतिनिधी) – कोरोना संशयित व्यक्तींच्या स्वॅब तपासणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर आज (दि.२०) जिल्ह्यात ५९६ कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे कोरोनाबाधितांची एकूण संख्या ४३ हजार ८९७ झाली आहे. दरम्यान आज ६०५ कोरोनाबाधितांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. दरम्यान १६ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
आज आढळलेल्या ५९६ कोरोनाबाधितांमध्ये सर्वाधिक जळगाव शहरात १०० रुग्ण आढळले असून, या व्यतिरिक्त जळगाव ग्रामीण ३२, भुसावळ ८८, अमळनेर ७, चोपडा ५५ , पाचोरा २०, भडगाव २६, धरणगाव २७, यावल ३९, एरंडोल २४, जामनेर ४२, रावेर २८, पारोळा ३६, चाळीसगाव २९, मुक्ताईनगर २४, बोदवड ९ इतर जिल्ह्यातील १० याप्रमाणे समावेश आहे.
दिवसभरात १६ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात अमळनेर तालुक्यात ५, पारोळा, चोपडा तालुक्यात प्रत्येकी २, जळगाव, जळगाव ग्रामीण, जामनेर, चाळीसगाव, भुसावळ, रावेर, एरंडोल तालुक्यात प्रत्येकी एक बाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here