पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – येथे महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री ना.अनिल देशमुख यांची अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी भेट घेतली.
या भेटीत कलाकारांच्या अडचणी, शासनाची कलाकारांच्या कल्याण मंडळाची गरज, कलाकारांना पोलीस मदत, नागपूरला चित्रपट महामंडळाच्या ऑफिस साठी जागा , या संदर्भात अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबरोबर सविस्तर चर्चा करून त्यांना कलाकारांच्या विविध मागण्यांचे निवेदन दिले.तसेच लवकरात लवकर आपण या मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी विनंती मेघराज राजेभोसले यांनी केली. यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या मागण्या पूर्ण करण्यासाठी निश्चितच प्रयत्न करू असे आश्वासन दिले.
Home पश्चिम महाराष्ट्र पुणे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्यावतीने गृहमंत्री ना.देशमुख यांना कलाकारांच्या विविध मागण्यांचे निवेदन







