पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – सप्तरंगी सामजिक गट आणि पृथ्वी संथेच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून (मुरबाड, किन्व्हली, टोकावडे)ठाणे ग्रामीण पोलिसांना कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आवश्यक असणारा, अतिशय उपयुक्त, रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी आयुष काढ्याचे वाटप करण्यात आले.
तसेच हा सामजिक उपक्रम यशस्वी करण्यासाठी अनेक व्यक्तींनी सढळ हस्ते मदत केली.तसेच पृथ्वी संस्थेचे उपाध्यक्ष श्री.संदीप लांडगे ह्यांचे या सामाजिक उपक्रमास विशेष योगदान लाभले.तसेच मा.डॉ.बसवराज शिवपूजे (मा.पोलीस उप-अधीक्षक, मुरबाड) ह्यांचे विशेष सहकार्य लाभले. ह्या सर्व सामाजिक उपक्रमात श्री.भूषण तारमाळे, श्री.चंद्रकांत पादीर, श्री.राहुल सुरंगे, श्री.आकाश डहाळे , श्री.पंकज पाटील , श्री.अनिल पेणकर, श्री.वेलणकर आणि श्रीमती.कोमल डोहळे ह्यांनी विशेष प्रयत्न केले. ह्या सर्व उपक्रमात ठाणे ग्रामीण पोलिस मा.अप्पर पोलीस अधीक्षक श्री.संजयकुमार पाटील यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. असे अनेक सामाजिक उपक्रम यशस्वीपणे राबविण्यासाठी पृथ्वी संस्थेचे उपाध्यक्ष श्री.संदीप लांडगे सदैव प्रयत्न करतात.
Home पश्चिम महाराष्ट्र पुणे सप्तरंगी सामाजिक गट आणि पृथ्वी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयुष काढा वाटप







