नाशिक (जिल्हा प्रतिनिधी सतीष पाटील) – इतकेच मला जाताना मरणावर कळले होते , मरणाने केली सुटका , जगण्याने छळले होते … या कविवर्य सुरेश भट यांच्या कवितेचे स्मरण करोनाच्या निमित्ताने सर्वांना येत आहे . कोणामुळे वाट्याला येत असलेला एकांत व अखेरच्या प्रवासाला ‘ एकला चलो रे ‘ यातून या कवितेचा खरा अर्थ समोर येत आहे . करोनाग्रस्तांच्या बळींचा आकडा पाहता , मरणाने केली सुटका , अमरधाममध्ये मृत्यूनंतरही वाट्याला आल्या यातना , असे म्हणण्याची वेळ नाशिककरांवर आली आहे.
नाशिक पूर्व व पंचवटी स्मशानभूमी वास्तव
दिवसाला साधारण ४० अंत्यसंस्कार
१ तासाला २ अंत्यसंस्कार
दिवसा २० व रात्री २० अंत्यसंस्कार
पूर्व भागात १५ अंत्यसंस्कार बेड , १ विद्युत व १ गॅस दाहिनी
गॅस दाहिनीचा वापर कमीच
पंचवटी अमरधाम येथे ९ बेड , यातील २ खराब . वेळ पडल्यास जमिनीवर अंत्यसंस्कार
शहरात करोनाचा वाढता संसर्ग . आता अधिक भीतीदायक ठरू लागला असून यात प्रतिदिन सात – आठ जणांचा मृत्यू होऊ लागला आहे . हे प्रमाण सरासरी असले तरी कधी एकाच दिवशी १८-१९ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे . अशाप्रकारे करोनाग्रस्तांच्या मृत्यूनंतर आयसीएमआर यांच्या निर्देशानुसार त्या पार्थिवावर अंतिम संस्कार केले जात असून ठराविक नातेवाईकांना ‘ केवळ दूरवरुन अंतिम दर्शनदेखील नशिबात नाही . महापालिका सेवक व सामाजिक संस्थांचे कार्यकर्तेच नातेवाईक बनून अंत्यसंस्कार पार पाडत आहे . मागील महिन्यात विद्युत दाहिनी बंद पडल्यानंतर जे काही नाशिक सुधारणा झालेली अमरधाममध्ये घडले , ते संतापजनक असेच होते .
अंत्यसंस्कारांसाठी दोन – दोन दिवस प्रतिक्षा करावी लागली . हा संतापजनक प्रकार माध्यमांनी समोर आल्यानंतर परिस्थिती सुधारुन आप्तांच्या कष्टदाय यातना कमी होतील अशी अपेक्षा होती . मात्र अजुनही परिस्थितीत नाही . शहरातील पुर्व भागातील अमरधाममध्ये दुसऱ्या नवीन विद्युत दाहीनीचे अद्याप सुरुच असुन त्यास अजुन आठ दिवस लागणार आहे . परिणामी एकाच विद्युत दाहीनीवर संध्या लोड असून हा लोड कमी करण्यासाठी लाकडाच्या बेडचा वापर केला जात आहे . तसेच याठिकाणी गॅस दाहीनी असली तरी येथील कर्मचाऱ्यांच्या मर्जीनुसार तिचा वापर होत असल्याचे सांगितले जात आहे . तसेच नदी काठालगत देखील अंत्यसंस्कार केले जात आहेत . याठिकाणी कोविड व नॉन कोविड मृतांवर अंत्यसंस्कार होत असल्याने नंबर कधी लागणार , या प्रतिक्षेमुळे मोठा त्रास आप्तांना होत आहे .
अशीच अवस्था पंचवटी अमरधाममध्ये सुरू आहे . याठिकाणी असलेल्या अंत्यसंस्कार बेडपैकी १ – २ बेड खराब असल्याने उर्वरित बेडवर मोठा ताण पडत आहे . पार्थिवांची संख्या वाढल्यानंतर याठिकाणी जमिनीवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ येत असून यात अनेक तासांची प्रतिक्षा करावी लागत आहे . यात याठिकाणी असलेल्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून सुरु असलेल्या वशिलेबाजीचा मोठा फटका नगरसेवकांना बसू लागला आहे.







