बोदवड (प्रतिनिधी ज्ञानेश्वर पारधी) – बोदवडसह परिसरातील कापूस सह ईतर पिकांची पाहणी करून तात्काळ पंचनामे करण्याच्या खासदार रक्षाताई खडसे यांचे प्रांत अधिकार्यांना सूचना दिल्या आहेत. कापूस मका ज्वारी उळिद इ. सह कांदा फळबाग मुसळधार पावसामुळे कापूस केळी पिकांसह नुकसान झाले आहे.
मुसळधार पावसासह जोरात वारा असल्यामुळे अनेक पिके भुईसपाट झाले आहेत. मोठय़ा बागायती शेताचेदेखील नुकसान झाले. तसेच दोन दिवसापासून नदी नाले भरले आहे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला असून शेतकरी संकटात सापडला आहे तसेच खा. रक्षाताई खडसे यांनी प्रशासनाला पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत.







