बॉलिवूडमध्ये झिरो फिगरची क्रेझ सुरू करणारी करिना कपूर

मुंबई (जॉनी वाझ) – बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूरचा आज २१ सप्टेंबरला आपला ४० वा वाढदिवस साजरा करत आहे. वयाची तिशी पार केल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्रींची करिअरची गाडी मंदावते. चेहऱ्यावर वय दिसून येतं. परंतु, करिना कपूर याला अपवाद आहे. तिने नव्या वर्षात देखील आपले करिअर एका नव्या उंचीवर नेऊन ठेवले. जाहिरातीपासून चित्रपटांपर्यंत तिला ऑफर्स आताही मिळतात. आतादेखील तिच्या चेहऱ्यावरील तेज, सौंदर्य कायम आहे.
चित्रपटांशिवाय करिना कधी झिरो फिगरमुळे तर कधी प्रेग्नेंसीमुळे चर्चेत राहिली आहे. बॉलिवूडमध्ये झिरो फिगरची क्रेझ सुरू करणारी करिना आपल्या फिटनेसविषयी नेहमीच जागरूक असते. वयाच्या चाळीशीतही ती आपल्या फिटनेसबद्दल चर्चेत राहते. प्रेग्नेंसीनंतर वाढलेले वजन कमी करून तिने ‘वीरे दी वेडिंग’मध्ये आपले फिटनेस पुन्हा दाकवून दिले. ‘वीरे दी वेडिंग’मध्ये करिना भाव खाऊन गेली, अशी चर्चादेखील तिच्याबद्दल होऊ त्यावेळी लागल्या होत्या.
आपल्या प्रेग्नेंसी दरम्यान, करिना आपल्या ड्रेसिंग स्टाईलबद्दल चर्चेत राहिली होती. प्रेग्नेंसीनंतर पुन्हा शेपमध्ये येण्यासाठी तिने खूप मेहनत घेतली. ‘वीरे दी वेडिंग’च्या शूटिंगपर्यंत तिने आपले तब्बल १६ किलो वजन घटवले. २० डिसेंबर, २०१६ मध्ये तैमुरला जन्म दिल्यानंतर करिना फिटनेसच्या मार्गावर पुन्हा धावताना दिसली. कधी योगा क्लास, कधी जिम जॉईन करून आणि तासनतास घाम गाळून करिना पुन्हा झिरो साईज फिगरमध्ये आली.
तिने छोटे नवाब सैफ अली खानशी प्रेम केल्यानंतर एकच चर्चा रंगली ती म्हणजे दोन मुलांचा बाप आणि करिनापेक्षा १० वर्षांनी मोठा असणाऱ्या सैफशी करीनाचं सूत कसं जुळले. चित्रपटाच्या सेटवर प्रेम झालं आणि खमंग चर्चेनंतर अखेर सैफ-करीनाने लग्न केलं. प्रेग्नेंसीवेळीही ती चर्चेत आली. तैमुरच्या जन्मापर्यंत तिची चर्चा होतच राहिली. बेबोने नेहमी आपल्या अटींवर काम केले आहे. मग, तुम्ही तिला अकडू म्हणा किंवा गर्विष्ट. जर तिला कुठली गोष्ट आवडली नाही तर ती पटकन सांगते, मग त्यामध्ये तिचे नुकसान जरी असेल तरीही! करण जोहरसारख्या बॉलिवूड दिग्गज निर्मात्याचा चित्रपट तिने हे सांगून सोडला होता की, तिला चित्रपटाची मार्केट प्राईज दिली जात नाही. करिनाच्या या धाडसाचे कौतुक तिचे विरोधक देखील करतात.
करिनाचे आयुष्य एका उघडलेल्या पानांसारखे आहे. तिने कोणतीही गोष्ट लपवलेली नाही. ज्यावेळी ती शाहिद कपूरसोबत रिलेशनशीपमध्ये होती, त्यावेळीही तिने सार्वजनिकपणे सांगितलं होतं की, ती शाहिदवर प्रेम करते.
करिनाने वेगवेगळ्या शैलीतील अनेक भूमिका केलेल्या आहेत. आज हिंदी चित्रपटसृष्टीत सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. करिना कपूरचा जन्म मुंबई येथे झाला. वडील रणधीर कपूर व आई बबिता दोघेही त्यांच्या काळातील प्रसिध्द सिनेकलावंत. करिनाची मोठी बहीण करिश्मा हीदेखील सिनेअभिनेत्री आहे. करिनाचे शिक्षण जमनाबाई स्कूल, मुंबई आणि वेलहम गर्ल्स स्कूल देहरादून येथे झाले. त्यानंतर तिने मीठीबाई कॉलेज विलेपार्ले येथे कॉमर्स विषयातून दोन वर्ष शिक्षण घेतले. करिना कपूरने आपले सिने करियर जे.पी. दत्ता यांच्या रिफ्यूजी या चित्रपटाने सुरु केले. या चित्रपटात तिला सर्वश्रेष्ट नवोदित अभिनेत्रीचे फिल्मफेअर मिळाले. यानंतर तिने अनेक चित्रपटातून कामे केली परंतु ते चित्रपट यशस्वी झाले नाही. मात्र जब वी मेट या चित्रपटाने तिच्या करियरला टर्निंग पॉईट मिळाला. यातील तिच्या भूमिकेने ती हजारो सिनेरसिकांच्या हृदयावर राज्य करु लागली.
करिनाने आपल्यापेक्षा 10 वर्षांनी मोठ्या असलेल्या अभिनेता सैफ अली खानशी लग्न केले. गंमतीची गोष्ट म्हणजे सैफ अली खाानच्या पहिल्या लग्नावेळी लहानगी करिना आपल्या कुटुंबियासमवेत हजर होती.
सिने करियरमध्ये करिनाच्या नावावर काही रेकॉर्ड आहेत ते म्हणजे चित्रपटसृष्टीतील पाचही खान अभिनेत्यांबरोबर तिने काम केले आहे. आजवरच्या इतिहासात अभिनेत्रीने तब्बल 138 डिझायनर साड्या वापरल्याचा रेकॉर्ड हिरोईन या चित्रपटाद्वारे तिच्या नावावर आहे.
तिला आजवर रिफ्यूजी करिता नवोदित अभिनेत्री, 2001 अशोकाकरिता सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, 2004 चमेली सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, 2004 देव – सर्वोत्कृष्ट अभिनेत्री समीक्षकांचा पुरस्कार, 2006 ओंकारा करिता सर्वोत्कृष्ट अभिनेत्री समीक्षकांचा पुरस्कार, 2007 जब वी मेट सर्वोत्कृष्ट अभिनेती, , 2010 वी आर फॅमिली सर्वोत्कृष्ट अभिनेत्री असे फिल्मफेअर पुरस्कार मिळालेले आहेत.
करिनाने मांसाहार सोडला असून ती शुद्ध शाकाहारी आहे. तिने आपल्यासोबत काम करणाऱ्या अनेक कलाकारांनाही शाकाहारी बनवलं आहे. तिला ‘सेक्सिएस्ट वेजेटेरियन सेलिब्रिटी’ म्हणून निवडण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here