नाशिक (कुबेर जाधव) – कांदा भावात कुठल्याही प्रकारची भाववाढ न होता दिवसेंदिवस होत असलेली घसरण बघता महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेण्याचे ठरवले असून राज्य संपर्क प्रमुख कुबेर जाधव लवकरच याबाबत कृषी मंत्री मा. दादा भुसे याची भेट घेणार आहेत.
अवघ्या महाराष्ट्रातच नव्हे तर देशात कांद्याचे माहेरघर समजले जाणारे नाशिक जिल्ह्य़ातील कसमादे पट्ट्यात ऊन्हाळी कांद्याचे मोठ्या प्रमाणात ऊत्पादन झाले आहे. सालाबादाप्रमाणे दर वर्षी जुन महिन्यात ऊन्हाळी कांद्याला मागणी वाढते व कांद्याचे भाव वाढतात पण यावर्षी भाववाढ न होता दिवसेंदिवस होत असलेली घसरण बघता लवकरच महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे राज्य संपर्क प्रमुख कुबेर जाधव; प्रदेश संघटक कृष्णा जाधव; जिल्हा ग्रामीण अध्यक्ष जयदीप भदाणे यांचे सह इतर राज्य कांदा उत्पादक संघटनेचे पदाधिकारी राज्याचे कृषी मंत्री मा. दादा भुसे याची भेट घेऊन कांदा उत्पादकांच्या व्यथा मांडुन सातत्याने घसरत असलेल्या कांदा भावाबाबत चर्चा करणार असल्याचे कुबेर जाधव यांनी सांगितले. दिवसेंदिवस कांद्याचे भाव कमी होत आहेत. नाशिक जिल्ह्य़ातील प्रमुख बाजार समितीच्या खरेदी मध्ये भावात 300 ते 400 रूपयांची तफावत होत असुन नाशिक जिल्ह्य़ातील सर्व बाजार समितीच्या भावात थोडा फार फरक असावा त्यासाठी पणन विभागाने जातीने लक्ष देणे अवश्यक असल्याचे मत संपर्क प्रमुख कुबेर जाधव यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
यावर्षी सरकारने वेगवेगळ्या पिकांचे हमीभाव जाहीर केले असून कांदा पिकाबाबत मात्र सरकार उदासीन दिसत आहे.व कुठल्याही ठोस भूमिका घेत नसुन सरकार बघ्याची भूमिका घेत आहे. कांदा भाववाढीसाठी दरवर्षी राज्य सरकारने केंद्र सरकार कडे पाठपुरावा करून केंद्र सरकार निर्यात धोरण आखत असते परंतु ह्या वर्षी राज्य सरकारने कांदयाबाबत दाखवलेली ऊदासिनता व केंद्र सरकारने दाखवलेला ठेंगा हे कांदा उत्पादक शेतकरी यांच्यासाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. जेव्हा देशांतर्गत कांदा चे भाव वाढतात तेव्हा तत्काळ केंद्राचे पथक राज्यात दाखल होते व परिस्थितीचा आढावा घेऊन कांदा भाववाढ कशी कमी करता येईल त्यासाठी उपाययोजना आखली जाते. पण जेंव्हा कांद्याचे आतिरिक्त ऊत्पादन होते तेव्हा सरकार कांदयाबाबत कुठलीच उपाययोजना करत नाही. असे कुबेर जाधव यांनी सांगितले. तसेच राज्याचे कृषी मंत्री मा. कृषी मंत्री दादा भुसे हे कसमादे पट्ट्यातले असुन त्यांना कांदयाबाबत सर्व परिस्थिती माहिती असंताना कुठलाच पुढाकार घेत नाही म्हणून कांद्याचे भाव वाढ व्हावी यासाठी आपण चर्चा करणार आहोत असे जाधव म्हणाले.
महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संपर्क प्रमुख कुबेर जाधव यांनी आक्रमकता दाखवत आपल्या विषेश शैलीत सांगितले की कांद्याच्या भावात होणारी घसरण राज्य सरकार व केंद्र सरकार यांच्यात नसलेला ताळमेळ हेच मुख्य कारण असल्याचे सांगितले व आता राज्य कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली कांदा उत्पादक शेतकरी एकत्रित होत असुन येणाऱ्या दिवसात सरकार कुणाचे पण असो संघटना सरकारच्या विरोधात उतरल्यावाचुन रहाणार नाही असे नमूद केले.







