दोंडाईचा (संतोष कोळी)- येथील.आज दिनांक 22 जून 2020 संध्याकाळी 6 वाजता धुळे जिल्हा अखिल भारतीय युवा कोली /कोरी समाज दिल्ली शाखा महाराष्ट्र धुळे जिल्हा शाखा अंतर्गत दोंडाईचा येथील बैठक नुकतीच घेण्यात आली होती .या बैठकीत धुळे जिल्हा युवक संघटनेचे सरचिटणीस नंदलाल तुकाराम सावळे सर , जिल्हा कार्याध्यक्ष कोळी समाजाचे कार्यकर्ते होमगार्ड विनोद रोहिदास कोळी रा.महादेवपुरा दोंडाईचा यांची जिल्हा अध्यक्ष संतोष राघो कोळी (पत्रकार ) यानी यावेळी निवड केली . या प्रसंगी प्रमुख उपस्थिती जिल्हा संघटक अनिल रतिलाल जाधव व
दोंडाईचा शहराध्यक्ष मयूर भटू कोळी उपाध्यक्ष आप्पा संतोष कोळी सर युवक संघटनेचे तालुकाध्यक्ष बाबा महेंद्र कोळी प्रसिद्धी व सोशल मीडिया चे अध्यक्ष चेतन विनोद कोळी यांच्या उपस्थितीत आज दिनांक 22 जून 2020 रोजी दोंडाईचा वरवडे नगर परिषद दादासाहेब रावल स्टेडियम येथील साप्ताहिक आदेश पोलीस रिपोर्टर चे कार्यालय येथे बैठक घेण्यात आली होती. सदर बैठक प्रदेशाध्यक्ष संजीव शिरसाट सरचिटणीस डॉक्टर राजेंद्र सावळे यांच्या मार्गदर्शनाखाली व आदेशाने वरील पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली असे नियुक्तीपत्र जिल्हाध्यक्ष संतोष कोळी पत्रकार यांनी नमूद केले.तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा.. देऊन त्यांचे कौतुक केले आहे.







