जळगाव जिल्ह्यात आज ६२५ कोरोनाबाधितांनी केली कोरोनावर यशस्वी मात

जळगाव (प्रतिनिधी) – कोरोना संशयित व्यक्तींच्या स्वॅब तपासणीचा अहवाल आज (दि.२१) सायंकाळी मिळाल्यानंतर ४७५ कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यात जळगाव शहरासह अमळनेर व रावेर तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या सर्वाधिक आहे. दुसरीकडे ६२५ कोरोनाबाधितांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली असून, १८ कोरोनाबाधितांचा आज मृत्यू झाला आहे.
आज आढळलेल्या ४७५ कोरोनाबाधितांमध्ये जळगाव शहर-१११, जळगाव ग्रामीण-१५, भुसावळ-४३, अमळनेर-४५, चोपडा-३९, पाचोरा-७, भडगाव-४, धरणगाव-२२, यावल-२०, एरंडोल-१०, जामनेर-१८, रावेर-४५, पारोळा-२०, चाळीसगाव-४३, मुक्ताईनगर-२२, बोदवड-७ व दुसर्‍या जिल्ह्यांमधील ४ असा समावेश आहे.
आजचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ४४ हजार ३७२ झाली आहे. यातील ३३ हजार ५६६ कोरोनाबाधितांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली असून, सद्यस्थितीत ९ हजार ६९२ कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत. दरम्यान आज १८ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून, एकूण मृतांचा आकडा १११४ झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here