आज आढळले ६११ कोरोनाबाधित; ११ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू
जळगाव (प्रतिनिधी) – कोरोना संशयित व्यक्तींच्या स्वॅब तपासणीचा अहवाल आज (दि.२२) सायंकाळी प्राप्त झाल्यानंतर जिल्ह्यात ६११ रूग्ण आढळून आले असून ११ रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण रुग्णसंख्या ४४ हजार ९८३ झाली आहे. यातील सर्वाधिक १४४ रुग्ण हे जळगाव शहरात आढळून आले आहेत. दरम्यान ८०९ कोरोनाबाधितांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. सलग तिसऱ्या दिवशी कोरोनाबाधितांच्या संख्येपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या जास्त आहे.
आज आढळलेल्या ६११ कोरोनाबाधितांमध्ये जळगाव शहर १४४, जळगाव ग्रामीण २१, भुसावळ ९५, अमळनेर ३७, चोपडा ५८ , पाचोरा १६, भडगाव १५, धरणगाव ३३, यावल १८, एरंडोल २२, जामनेर ३३, रावेर ६, पारोळा ६०, चाळीसगाव २३, मुक्ताईनगर १२, बोदवड ११ इतर जिल्ह्यातील ७ असा समावेश आहे.
आज दिवसभरात ११ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. यात जळगाव शहर, भुसावळ तालुक्यात प्रत्येकी ३, चोपडा, यावल तालुक्यात प्रत्येकी २, पाचोरा तालुक्यात एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिली आहे.







