- जामनेरमध्ये सकल मराठा समाजाचे दोन तास रास्ता रोको आंदोलन
- आमदार गिरीश महाजन यांच्या घरासमोर डफली बजाओ आंदोलन
भुसावळ (प्रतिनिधी गिरीश पवार) – महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्याने मराठा समाजात मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला आहे. या असंतोषाला वाट मोकळी करून देण्यासाठी आज मराठा समाजातील लॉकडाऊन आणि कोरोनाचे सर्व नियम पालन करत तरुण रस्त्यावर उतरले.
जामनेर शहरात नगरपालिका चौकाजवळ सुमारे दोन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्याच प्रमाणे मराठा क्रांती मोर्चाने ठरविल्याप्रमाणे जामनेरचे आमदार आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या निवासस्थानी डफली बजाओ आंदोलन करण्यात आले. सकल मराठा समाज आणि संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने आंदोलनस्थळी उपस्थित होते. सोशल डिस्टन्स ठेवून , कोरोनाचे सर्व नियम पालन करून तरुणाईने दिलेल्या घोषणांनी जामनेर शहर नगर परिषद चौक दणाणून गेला होता. आमदार गिरीश महाजन हे मुंबईला असल्याने मराठा समाज क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी दूरध्वनीवरून त्यांच्याशी संपर्क साधला. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी भारतीय जनता पार्टी बांधील असल्याचे प्रतिपादन यावेळी गिरीश महाजन यांनी कार्यकर्त्यांची बोलताना केले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की आज जामनेर शहरातील राजमाता जिजाऊ चौक नगर परिषद समोर रास्ता रोको , डफली बजावो आंदोलन जोरदारपणे करण्यात आले. मराठा क्रांती ठोक मोर्चाचे सकल कार्यकर्ते, सकल मराठा समाज आणि संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते तेथून गिरीशभाऊ महाजन यांच्या घरासमोर तेथे जोरदार डफली बजावो करण्यात आले. आमदार गिरीश महाजन घरी नव्हते. मोबाईलवरुन आंदोलकांच्या भावना त्यांनी जाणून घेऊन मराठा आरक्षण समितीमध्ये आपण होतो, त्यामुळे त्यातील बारकवे आपल्याला माहित होते. नेमक स्थागितीच कारण काय? भाजपा ची अधिकृत भूमिका काय ? उच्च न्यायालयात तुम्ही दिलेले आरक्षण राहिले मग सुप्रीम न्यायालयात का टिकले नाही ? आपल्या मतदार संघात बहुतांशी मराठा समाज आहे म्हणून आपण प्रयत्न करणार की नाही ? असे प्रश्न त्यांना विचारण्यात आले. त्यावर भाजपा तसेच विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी बारीक सारिक विचार करुण आरक्षण दिले होते .परंतु महाविकास आघाडीने योग्य पाठपुरावा न केल्याने त्यावर स्टे आला . आरक्षणावरील स्टे काढण्यासाठी आम्ही विरोधी पक्ष म्हणून सरकारच्या पाठीशी असून योग्य ते मार्गदर्शन आरक्षण दिलेल्या उपसमितिचा भाग म्हणून आम्ही या सरकारला करीत असल्याची ग्वाही आमदार गिरीश महाजन यांनी दिली..
केंद्र सरकार अध्यादेश काढू शकते. असे त्यांनी सांगितले. तर राज्य व केंद्र सरकार यांच्या राजकारणात इतर राज्याच्या आरक्षणवार स्टे मिळाला नाही. पण आपल्या राज्यात मिळाला यावर त्यांनी सुप्रीम कोर्ट च्या निर्णयाला आव्हान देता येत नाही .असे सांगुन वेळ मारली !आंदोलनात सर्व राजकीय पक्षाचे समाज बांधव तसेच युवक वर्गाचा फार मोठा भरणा होता . आंदोलनात प्रदिप गायके, मनोजकुमार महाले, माधव चव्हाण ,बी .आर .पाटील सर्, गोपाल पाटील ,डॉक्टर बाजीराव पाटील ,योगेश पाटील ,सागर पाटिल, प्रल्हाद बोरसे, अमोल ठोबरे, राम अपार, विश्वजीत पाटील , सामाजिक कार्यकर्ते दशरथ पाटील, जितेश पाटिल, अतुल सोनवणे, रवि बंडे, गोपाल मराठे, अमोल चव्हाण अविनाश बोरसे, प्रविण गावंडे, आकाश बंडे, गोपाल चौधरी, अमोल पाटिल ,कपिल पाटिल,समाधान थाटे, श्रीराम पाटिल, रूपेश पाटिल, कपिल गायकवाड़, जीतू गवळी, गौरव पंडित, अतुल सोनवणेयांच्यासह मराठा क्रांती ठोक मोर्चा चे असंख्य तरुण आंदोलनासाठी उपस्थित होते.







