महाराष्ट्र हेल्थ फाऊंडेशनच्यावतीने जालिंदर बोरुडे यांचा कोरोना योध्दा म्हणून सन्मान

फिनिक्स फाऊंडेशनने कोरोना महामारीत
सर्वसामान्य रुग्णांना आधार दिला -डॉ.संभाजी सोनवणे

अहमदनगर (प्रतिनिधी) – कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवरील टाळेबंदी काळात फिनिक्स सोशल फाऊंडेशनने सर्वसामान्य रुग्णांसाठी मोफत नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया व विविध आरोग्य शिबीर घेतले. या कार्याची दखल घेत मुबई येथील महाराष्ट्र हेल्थ फाऊंडेशनने फिनिक्स फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे यांना कोरोना योध्दा पुरस्कार प्रदान केले. महाराष्ट्र हेल्थ फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.संभाजी सोनवणे व सचिव शरद कांबळे यांनी बोरुडे यांना पुरस्कार प्रदान केले.
कोरोनाच्या टाळेबंदीत गरजू रुग्णांची गरज ओळखून शहरासह ग्रामीण भागात मोठ्या धाडसाने फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने विविध मोफत शिबीरे घेण्यात आली. मागील पाच महिन्यात कोरोना काळात नियमांचे पालन करुन झालेल्या शिबीराचा तब्बल 2680 गरजूंनी लाभ घेतला. तर 348 ज्येष्ठ नागरिकांच्या मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया यशस्वी पार पडल्या. नागरिकांची विविध आरोग्य तपासणीसह नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रियाचे 16 शिबीर घेण्यात आले. गरजूंना मोफत चष्मे व औषधांचे वाटप करण्यात आले. तर नागरिकांमध्ये कोरोनाबद्दल जनजागृती करुन त्याला प्रतिबंध करण्यासाठी आर्सेनिक गोळ्या, मास्क व सॅनीटायझरचे वाटप करण्यात आले.
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर टाळेबंदी काळात इतर उपचारासाठी नागरिकांना अनेक हॉस्पिटलमध्ये चकरा माराव्या लागल्या. तर कोरोनामुळे अनेक डॉक्टर रुग्णांना दवाखान्यात घेण्यास देखील घाबरत होते. टाळेबंदीमुळे आर्थिक परिस्थिती बिकट झाल्याने अनेक रुग्ण विविध आजाराच्या उपचारापासून वंचित होते. ही जाणीव ठेऊन फिनिक्सने नियमांचे पालन करुन विविध ठिकाणी आरोग्य शिबीर घेऊन सर्वसामान्यांना मोठा आधार दिल्याचे डॉ.संभाजी सोनवणे यांनी सांगितले. कोरोनामुळे इतर आजाराच्या गरजू रुग्णांची परवड होऊ नये यासाठी फिनिक्सने पुढाकार घेऊन शिबीर घेतले असल्याचे बोरुडे यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here