काठमांडू – तिबेटमधील रस्ता बांधण्याच्या बहाण्याने चीन नेपाळवर अतिक्रमण करत असल्याची बातमी अलीकडेच नेपाळी माध्यमांमध्ये आली होती. तसेच, काही भागात नेपाळ आणि चीनमधील सीमारेषा दाखवणाऱ्या खांबांची चोरी झाल्याचे वृत्त आहे. या घटनाक्रमानंतर नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयाने या वृत्ताचा निषेध करत एक निवेदन जारी केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, जे खांब गहाळ असल्याचे सांगितले जात आहे, ते प्रत्यक्षात तेथे नव्हते. तथापि, सरकारने आपल्या निवेदनात, तिबेटमध्ये नद्या फिरवून जमीन हडपण्याबाबत काहीही सांगितले नाही.
मंत्रालयाने म्हटले आहे की, काही माध्यमांच्या वृत्तांमध्ये नेपाळ-चीन सीमेवरील अतिक्रमणाबद्दल बोलले गेले आहे. हा अहवाल कृषी मंत्रालयाच्या कथित ‘अहवाला’वर आधारित आहे. जो मंत्रालयाने यापूर्वीच नाकारला आहे. आणि हे प्रकरण त्यांच्या कार्यक्षेत्रात येत नाही. मंत्रालयाचे म्हणणे आहे की, ५ ऑक्टोबर १९१९ रोजी नेपाळ आणि चीन यांच्यात सीमा कराराअंतर्गत सीमारेषा ठरविण्यात आली होती, आणि दोन्ही देशांकडून या प्रोटोकॉलवर स्वाक्षरी करण्यात आली होती.







