दाऊदचा साथीदार इक्बाल मिर्चीची २०३ कोटींची मालमत्ता जप्त

नवी दिल्ली – अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा साथीदार इक्बाल मिर्ची याची दुबईतील २०३ कोटींहून अधिकची मालमत्ता अंमलबजावणी संचालनालयाने ( ED) मंगळवारी जप्त केली. जप्त मालमत्तेत मिर्चीच्या कुटुंबातील सदस्यांच्या १५ व्यावसायिक आणि निवासी मालमत्ता आहेत. त्यामध्ये मिडवेस्ट हॉटेल अपार्टमेंट्स नावाचे हॉटेल देखील आहे, अशी माहिती ईडीने दिली.
इक्बाल मिर्चीच्या जप्त केलेल्या मालमत्तेची किंमत जवळपास २०३.२७ कोटी इतकी आहे. मनी लाँड्रींग प्रकरणी ( (पीएमएलए)) कायद्यांतर्गत ही कारवाई केली, अशी माहिती ईडीने दिली आहे. कपिल वाधवान आणि धीरज वाधवान यांच्या वाधवान बंधुंच्या मालकीच्या दुबईतील कंपनीने ही संपत्ती मिर्ची कुटुंबाला हस्तांतरित केली होती, असं ईडीने सांगितलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here