बहुजन क्रांती मोर्चाच्यावतीने बुलंद पोलीस टाइम्सचे योगेशराव पी पाटील यांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान

धरणगाव (प्रा.पी.एम.पाटील) – मंगळवार दि. २२ सप्टेंबर २०२० रोजी धरणगाव शहरातील पत्रकार बांधवांचा बहुजन क्रांती मोर्चा च्या वतीने कोरोना योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला. यामध्ये ज्येष्ठ पत्रकार कडू रूपा महाजन ( तरुण भारत ) , सतिष बोरसे (दैनिक सामना ), योगेश पी पाटील ( बुलंद पोलीस टाईम ) , मगनलाल बन्सी (EBM NEWS) , कल्पेश महाजन ( दिव्य मराठी ) , हाजी साहेब ( साईमत ) , रविभाऊ महाजन (सकाळ) या सर्व पत्रकार बांधवांचा बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने कोरोना योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला…
याप्रसंगी बहुजन क्रांती मोर्चा चे संयोजक आबासाहेब राजेंद्र वाघ , बामसेफ तालुका अध्यक्ष पी. डी. पाटील , उपाध्यक्ष हेमंत माळी , किशोर पवार , छत्रपती क्रांती सेनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण पाटील , इंदिरा गांधी विद्यालयाचे शिक्षक डी. एम. पाटील , एन. बी. पाटील , प्रोटॉन संघटनेचे तालुका अध्यक्ष सुनिल देशमुख , आकाश बिवाल , राष्ट्रीय किसान मोर्चाचे शहराध्यक्ष गोरख देशमुख , भारत मुक्ती मोर्चा चे तालुकाध्यक्ष गौतम गजरे ,बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क तालुका अध्यक्ष निलेश पवार , राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे नगर मोमीन , करीम लाला , रईस मोमीन ,बहुजन क्रांती मोर्चाचे बबलू वाघमारे ,ओंकार माळी , प्रकाश सपकाळे , महेंद्र तायडे , विकास पवार यांच्यासह बामसेफ व सहयोगी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here