जिवाभावाचा मित्र लतिष अभिष्टचिंतन
शाम जाधव (पत्रकार)
अगदी त्याच्या सारखा तोच त्यामुळेच की काय ? लतिष नावाचा दुसरा इसम सुद्धा चोपडा तालुक्यात नाही .आज त्याचा वाढदिवस त्यानिमित्ताने त्याला मनापासून खूप खूप शुभेच्छा ! त्याची आणि माझी पहिली भेट कधी झाली हे नक्की सांगता येणार नाही ,किंबहुना भेटी ठरवून मी तरी मैत्री करीत नाही.
लतिष आणि मी गेली काही वर्षे सोबत पत्रकारिता करत असतांना पत्रकार ते एका दैनिकाचे (खान्देश एक्सप्रेस )मालक असा काहीसा जिकरीचा पण अनुभवी प्रवास केला , प्रेरणा दर्पण फाऊंडेशन या सेवाभावी संस्थेचा तो सचिव देखील आहे .सोबत काम करत असतांना त्याचे आणि माझे मतभेद (मन भेद नव्हे ) अनेकवेळा होतात मी अगदी हक्काने त्याला रागावून देखील घेतो .पण नंतर बोलण्यासाठी पहीला फोन देखील मीच करतो मैत्रीत वाद -विवाद ,भांडण ,राग ,निकोप स्पर्धा असलीच पाहिजे पण मत्सर,द्वेष ,नसावा आणि तो आमच्या मैत्रीत आजवर नाही म्हणून बहुदा ही मैत्री टिकली असावी.मैत्रीत विश्वास असावा श्रद्धा असावी एक दुसऱ्याला ऐकुन घेण्याची समजून घेण्याची तयारी असावी आणि ती आमच्यात असेल म्हणून ही मैत्री टिकली असावी.असं म्हणतात मैत्रीअसावी तर श्रीकृष्ण-सुदामा सारखी भर राजदरबारात सारं ऐश्वर्य विसरून फाटक्या मित्राला कडकडून मिठी मारायला लावणारी …मैत्री असावी तर कर्ण – दुर्योधना सारखी,मित्र असत्य अधर्माच्या बाजूने लढतो आहे हे माहीत असून सुद्धा त्याची साथ देत रणांगणावर नातेवाईकांसह देवतांशी शत्रुत्व पत्करणारा मैत्रीचे असे अनेक उदाहरण सांगता येतील.
आज करलो दुनिया मुटठी मे म्हणत या मोबाईल मूळे जगणं मुश्कील झालंय वरून तेच आपल्याला शिकवतात जियो धन धना धन …समोरून मित्रच काय नातेवाईक गेला तरी आपण बोलत नाही .आपल्याला व्यक्त व्हायला हातातला मोबाईल व्हाट्सएप आणि फेसबुक मिळाले तिथंच घोळ झाला खर बघितलं तर मनातल्या भावना , सुख दुःख राग आनंद संकट हे कोण्यातरी जिवाभावाच्या मित्रा जवळ व्यक्त केल्यात तर ट्रेस कमी होतो हा माझा फक्त विश्वास नव्हे तर हे सत्य आहे लतिष आणि मी आमच्या वैयक्तिक,पारिवारिक,सामाजिक,व्याव सायिक अश्या गोष्टी एकदुसऱ्या सोबत शेअर करतो एव्हाना मनातील प्रत्येक विचार विश्वास पूर्वक सांगण्याईतका लतिष जवळचा व विश्वासू आहे लतिष कधीही कोणालाही भेटला तर नेहमी हसतमुख चेहरा घेऊनच.
चेहरा हसरा असला तरी त्यानेआजवर संसारिक पारिवारिक काय दुःख भोगले आहे हे मी जाणतो अनेक संकटांवर मात करीत तो आपले व्यक्तीमत्व टिकवून आहे यातच खरा सार आहे अन्यथा पत्रकारिता जेवढी चांगली तेवढी वाईट सुद्धा आहे.मी जवळ जवळ 20 -22 वर्षे पत्रकारिता केली पण गेल्या काही वर्षांपासून लिखाणाला स्वल्पविराम दिला आहे.पण आज जिवाभावा चा मित्र लतिष याचा वाढदिवस आहे हे माहीत झाल्यावर रहावले नाही.मित्रा आज तुझा वाढदिवस…. येणारा प्रत्येक दिवस तुझ्यासाठी आनंदाचा, भरभराटीचा,आरोग्यदायी,समृद्धीचा
कीर्तीचा,व समाधानाचा यावा अशी प्रभू चरणी प्रार्थना ! एकवेळ आनंदाच्या क्षणी विसरलास तर चालेल पण दुःखात विसरलास तर मात्र तुला बघून घेईल या प्रेमळ धमकीसह पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा !!!







